जळगाव जामोद तालुका सरपंच संघटने कडून पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचा सत्कार व विस्तार अधिकारी संदीप मोरे यांची मोताळा येथे केलेली प्रतिनियुक्ती रद्द करण्याबाबत निवेदन...


 बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

 रविवार दिनांक. ५ सप्टेंबर रोजी बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री  डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांचा जळगाव जामोद तालुका येथे दौरा होता.त्या दरम्यान जळगाव जामोद येथील शासकीय विश्रामगृह येथे सरपंच संघटनेच्या वतीने डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच संघटनेने पंचायत समिती जळगाव जामोद  येथील कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी श्री संदीप मोरे यांची मोताळा येथे केलेली नियुक्ती तात्काळ रद्द करावी असे निवेदन दिले. या निवेदना मध्ये असे नमूद आहे की श्री मोरे हे नेहमीच सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये समन्वयकाची भूमिका निभावत असतात तसेच त्यांच्या पूर्ण कार्य काळामध्ये तालुक्यातील कुणीही सरपंचाची कुठलीही तक्रार नाही.तसेच सर्व सरपंचांनी आपापल्या  गावांकरिता विविध योजनांमधून जसे जिल्हा वार्षिक योजना, अल्पसंख्यांक विकास योजना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास योजना, जिल्हा वार्षिक योजना- जनसुविधा,  इतर योजनांमधून निधी मिळावा याबाबत निवेदन दिले.यावेळी पालकमंत्र्यांनी श्री मोरे यांची बदली तात्काळ रद्द करण्याबाबत सरपंचांना आश्वस्त केले तसेच जळगाव जामोद तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीला जास्तीत जास्त निधी मिळण्याकरता प्रयत्न करण्याबाबत आश्वासन दिले.यावेळी तालुक्यातील सर्व सरपंच उपस्थित यामध्ये संघटनेचे तालुकाअध्यक्ष राजेश समाधान शित्रे मडाखेड, तालुका उपाध्यक्ष सौ गंगुबाई पुंडलीकराव दामधर  जामोद, सचिव रमेशभाऊ नाईक  गाडेगाव बु., सौ शितल सुनीलराव वानखडे वडशिंगी, सौ शोभा तुकाराम इंगळे चावरा, अनंत प्रभाकर सुशिर गोळेगाव खुर्द, सौ वैशाली विश्वंभर वावगे, सौ शालिनी संदेश आठवले कुरणगाळ, सौ उज्वला तुकाराम वाघ भेंडवळ, विजय शालिग्राम कड मडाखेड बु, सौ सारिका विलास इंगळे भेंडवड खू., सौ वर्षा सुहास वाघ काजेगाव, सौ शशिकला जगली मन रायपुरे सातळी, सौ सीमाताई देवचंद पवार दादुलगाव, रामेश्वर आत्माराम अंबडकार सुनगाव, संतोष खोद्रे पिंपरी खोद्री, सौ शीला नितीन उगले मांडवा, सौ उर्मिला रमेश चाकोते वडगाव गड, सौ आशा सुमेध वानखडे पळसखेड, सौ लिलाबाई सुरेश ठाकरे इत्यादी सरपंच उपस्तिथ होते, तर तालुक्यातील  इतर सरपंचांनी फोन वरून आपला पाठिंबा दर्शविला.

Previous Post Next Post