पथ्रोट जलशुद्धीकरण होणार स्वंयचलित.जिल्हाभरातील पहीले स्वंयचलीत जलशुद्धीकरण केंद्र...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

पथ्रोटकरांची तहाण भागविणारे शहानुर जलाशय परिसरात असलेले जलशुद्धीकरण केंद्र स्वंयचलीत होणार आहे. जिल्हाभरातील  स्वंयचलीत यंत्रणा जलशुद्धीकरण केंद्रात राबविण्याचा मान पथ्रोट  जलस्वराज्य २ प्रकल्प मिळवणार असल्याने गुणवत्तापुर्ण शुद्ध पाण्याचा पुरवठा होणार. यासह केंद्रातील यंत्रांचे आयुष्यमान वाढेल मानवी चुका व देखभाल दुरुस्ती खर्च कमी होईल. 0 पथ्रोटपासुन नजीकच्या शहानुर जलाशयातुन दर्यापुर, अंजनगाव शहरासह १५६ गावासह ७९ अधिभारीत गावाना पाणीपुरवठा होत होता मात्र पथ्रोट तहाणलेले होते. गत  सरपंचाच्या काळात जागतीक बँकेच्या अर्थसहाय्याने १६ कोटी ५९ लाख ३० हजार रुपयांची महत्वकांक्षी पाणी पुरवठा योजनेस मंजुरी मिळवत प्रत्यक्षात साकारली. महत्वपुर्ण जलशुद्धीकरण केंद्र व वितरण व्यवस्था स्वंयचलीत व्हावी या दृष्टीने जलस्वराज्य २ प्रकल्प समीती अध्यक्ष वासंतीताई मंगरोळे व सचीव यानी कार्यकारी मुख्य अभियंता अमरावती यांच्याशी चर्चा केली असता सदर जलशुद्धीकरण केंद्र स्वंयचलीत करण्याची मागणी करुन प्रस्ताव सादर केला. संबंधितानी प्रस्ताव मंजुर करुन साहीत्य प्रकल्पस्थळी पोहचल्याने कामास सुरवात झाल्याने भविष्यात यंत्रणा कार्यान्वीत होईल.जिल्हाभरातील ग्रामीण भागात जलस्वराज्य २ योजने अंतर्गत पथ्रोट, जरुड, अंजनगाव बारी, मंगरुळ दस्तगीर, सुकळी ही प्रकल्प आहेत. त्यापैकी जरुड, व पथ्रोट येथे जलशुद्धीकरण केंद्रात स्वंयचलीत यंत्रणा कार्यान्वीत होत आहे.

(अमरावती महानगरासारख्या ठिकाणच्या जलशुद्धी केंद्रावर सेमी अटोमायझेशन आहे मात्र ग्रामीण भागातील पथ्रोट प्रकल्पातील स्वंयचलीत यंत्रणा पुर्णतः आहे परिणामी देखभाल दुरुस्ती खर्च कमी होऊन फिल्टरचे आयुष्यमान वाढेल. - पाटील कार्यकारी मुख्य अभियंता अमरावती)

अधिकार्‍यानी योजनेचा प्रकल्प आराखडा तयार करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त समावेश केल्याने प्रकल्पास त्याचा लाभ झाला स्वंयचलीत यंत्रनेच्यादृष्टीने आम्ही मागणी केली असता ती मंजुर होवुन कार्यान्वीत होत असल्याने आम्ही समाधानी आहो. - योगेश दुबे सचिव जलस्वराज्य २ पथ्रोट.)

Previous Post Next Post