शिक्षक दिनी स्व.अनिल बाळ सराफ पुरस्कार जाहीर...


 विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

विदर्भ मुख्याध्यापक संघटनेच्याविदर्भातील उत्कृष्ट संघटनात्मक कार्य करणाऱ्या मुख्याध्यापकास दरवर्षी  स्व . अनिल बाळसराफ पुरस्कार दिला जातो पुरस्कारामध्ये स्मृतिचिन्ह सन्मानपत्र व रोख रक्कम पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या शुभहस्ते खास समारंभात हा पुरस्कार दरवर्षी दिला जातो सन २०२०-२१ या वर्षाचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यामध्ये गडचिरोली चे संजय नारलावर राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार , नागपूरचे मंदा उमाटे, बुलढाण्याचे विलासराव भारसाकळे, अमरावतीचे अशोक चोपडे यांना हा पुरस्कार विदर्भ मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शत्रुघ्न बिडकर यांनी नुकताच जाहीर केला असून संघटनेचे मार्गदर्शक नरेंद्र वाळके यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली त्यामध्ये मारुती खेडेकर नागपूर , दिपक दोंदल यवतमाळ, शत्रुघ्न बिरकड अकोला, सतीश जगताप वर्धा यांचा समावेश होता त्यांनी वरील नावावर शिफारस करून आज पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे सतीश जगताप यांनी कळविले आहे.

Previous Post Next Post