वरणगाव शहराच्या बाहेरून बायपास झाल्या मुळे इतर जिल्ह्यातील जलद बसेस ह्या वरणगाव शहरातून न जाता न थांबता थेट बायपासवरून सर्व जलद बसेस जात असल्याने वरणगाव करांचे हाल होत असल्याने आज विभाग नियंत्रक श्री भगवान जगनोर व सह्याक श्री बंजारा यांना आज प्रत्यक्ष जळगाव येथे भेटून माजी नगराध्यक्ष सुनील काळे भाजपा चे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे भाजपा शहर उपाध्यक्ष हितेश चौधरी तालुकाध्यक्ष साबिरभाई कुरेशी कमलाकर मराठे यांनी प्रत्यक्ष भेटून केली डी सी श्री जगनोर यांच्याशी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी या दरम्यान वरणगाव शहरातून जाणाऱ्या सर्व अति जलद बसेसला थांबा देण्यात यावा तसेच बसस्थानक चौफुल्ली वर वरणगाव वरून जाणाऱ्या येणाऱ्या बसेस ची वेळा पत्रक लावण्यात यावे तसेच वरणगाव चौफुल्ली वर कंट्रोलर कायमस्वरूपी नेमण्यात यावा जेणेकरून बसच्या विध्यार्थी व जेष्ठ नागरिकांच्या सर्व पासेस वरणगाव येथूनच वितरित करण्यात याव्या भुसावळ ला जाणे शक्य नाहीं तसेच प्रवाश्यांना बसण्यासाठी बेंच बसविण्यात यावे अश्या वरणगाव करांच्या हिताच्या मागण्या यावेळी करण्यात आल्या याप्रसंगी विभाग नियंत्रक श्री भगवान जगनोर यांनी वरणगाव शहरातून सर्व अतिजलद बसेसला थांबा देण्यासाठी सूचित करतो व एक कंट्रोलर वरणगाव येथे नेमतो असे यावेळी डी सी श्री जगनोर व श्री बंजारा यांनी यावेळी सांगितले.
वरणगांवात सर्व जलद बसेस ला थांबा देण्यात येऊन कंट्रोलर नेमावा.विभाग नियंत्रक श्री जगनोर यांच्या कडे माजी नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी...
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ