हिवरखेड येथे साध्या पद्धतीने शेतकरी बांधवानी पोळा उत्सव साजरा केला, दोन वर्षे अगोदर चौका चौकात बैल पोळा मोठ्या प्रमाणात भरायचा आणि शेतकरी बंधू नारळाची तोरणे बांधून मोठं मोठे पोवाळे मानायचे मात्र कोरोना मुळे पोळा उत्सवात घसरण आली असणार परंतु शेतकरी बांधवांचा उत्सव आनंद मात्र कमी नाही झाला, गावात सर्वांनी वर्षभर शेतात राबणारे आपले बैल छान प्रकारे सजावले सर्वांनी बैलाची पूजा केली ,आणि बैल पोळ्याचे औचित्य साधून गावात नगरपंचायत झालीच पाहिजे अशी जनजागृती केली, बऱ्याच बैलांच्या पाठीवर हिवरखेड नगरपंचायत झालीच पाहिजे अशी घोषणा लिहली, आधी या बैलाच्या पाठीवर मराठी हिंदी पिच्चर चे नावे लिहायचे कोणी लिहायचं ,नायक, तर कोणी खलनायक परंतु यावर्षी मात्र गावात शेतकऱ्यांनि त्यांच्या बैलाच्या पाठीवर ,फक्त आणि फक्त नगरपंचायत पाहिजे असे उदगार वाचक शब्द लिहले यावरून दिसून येते सर्व गावकर्यांना गावात नगरपंचायत पाहिजेच आता नागरिकांची प्रतीक्षा संपत आली गावात नगरपंचायत हा विषय फारच रंगत आहे, शासनाने या आधी गावकऱ्यांनी काही टोकाचे पाऊल उचलण्याआधी वरिष्ठ शासनाने त्वरित गावकऱ्यांनी मागणी पूर्ण करावी, गावकरी उत्स्फूर्तपणे गावाचा विकास होण्याचे स्वप्न पाहत आहेत त्याचे स्वप्न पूर्ण करून गावात नगरपंचायत त्वरित करावी अशी मागणी४० हजार नागरिक करीत आहेत.
हिवरखेड पोळ्याचे औचित्य साधून नगरपंचायत होण्यासाठी जनजागृती,साध्या पद्धतीने पोळा उत्सव साजरा,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.