कुरणगाड खुर्द येथील ग्रामसभा वैधच उपसरपंच यांनी केली बि.डि.ओ कडे तक्रार..


 जळगांव जामोद प्रतिनिधी:-

दिनांक 31 ऑगस्ट रोजी झालेली ग्रामसभा वैधच आहे अशी तक्रार उपसरपंच  सौ शारदा उल्हास झाटे यांनी आज दिनांक ६ सप्टेंबर रोजी पंचायत समिती कार्यालय जळगाव जामोद येथे केली आहे या तक्रारीत म्हटले आहे की दिनांक 31 ऑगस्ट रोजी कुरणगाड  खुर्द  येथील सरपंच सौ फुलवती बाबुराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा कोरम पूर्ण करून सर्व सदस्य हजर असताना संपन्न झाली या ग्रामसभेची दवंडी 30 ऑगस्ट रोजी कुरणगाड खुर्द,तरोडा बुद्रुक तरोडा खुर्द या तीनही गावांमध्ये देण्यात आली होती आणि २५ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हे हजर असताना ग्रामसेवक मॅडम यांनी ग्रामसभे बाबत चर्चा केली आपल्याला ३१ ऑगस्ट रोजी ग्रामसभा घ्यायची आहे असे ग्रामसेवक मॅडम यांनी सर्वांसोबत सविस्तर चर्चा केली व त्या नंतर ३१ तारखेला ग्रामसभेचा कोरम पूर्ण करून ग्रामसभेमध्ये गाव   समितीचे  निवड प्रक्रिया पुर्ण करण्यात आली या निवड प्रक्रियेमध्ये सरपंच हजर होत्या व मुनादि काढलेल्या रजिस्ट्रार सरपंच यांची  सहि सुद्धा आहे,परंतु सरपंच बाई यांनी तक्रारीत म्हटले होते की मला अंधारात ठेवून ग्रामसभा आटोपली होती माझ्या माहिती प्रमाणे सर्व प्रक्रियेमध्ये सरपंच बाई हजर होत्या तसेच सरपंच बाई यांच्याविरोधात या अगोदर गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती की सरपंच आम्हाला विश्वासात घेत नाही व ग्रामपंचायत कामकाजामध्ये पूर्ण वेळ देत नाही असे मागील तक्रारीत नमूद आहे या दोन्ही तक्रारीमध्ये गटविकास अधिकारी यांनी जातीने लक्ष घालून योग्य तो मार्ग काढुन जनतेला होत असलेला त्रास थांबवावा असे तक्रार अर्जात नमुद आहे.

Previous Post Next Post