वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील धनगर समाजाच्या वतीने आज पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी बैल आणि शेतकरी यांचा देखील या ठिकाणी सन्मान करण्यात आला.वरणगाव शहरातील भोईवाडा येथे धनगर समाजाच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांची तिथीनुसार पुण्यतिथी साजरी करण्यात आली सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार मित्र चंद्रकांत हरी बढे हे होते व प्रमुख उपस्थिती मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र विश्वनाथ चौधरी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर माजी नगरसेवक सुधाकर भाऊ जावळे माजी नगरसेवक रवी भाऊ सोनवणे भाजपा शहर अध्यक्ष सुनील माळी एकनाथ पैलवान उपस्थित होते यांनी यावेळी बैल पोळ्या सणानिमित्त बैलजोडीचा सन्मान करण्यात आला, व उपस्थित असणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील सन्मान करण्यात आला यावेळी प्राध्यापक अनिल शिंदे सर हिप्पी सेठ संतोष माळी सईद मुल्ला धोंडू भोई संतोष माळी रमेश कोळी सुनील भाई शशी भाऊ चौधरी संजीव कोळी उपस्थित होते पन्नास वर्षांची मैत्री असणारे पोपट टेलर व भगवान टेलर यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला सुखदेव धनगर गजानन धनगर बाळा हरचंद धनगर राजू धनगर रुपेश धनगर लाला धनगर रवींद्र धनगर शिवा धनगर सुधाकर धनगर संतोष दौलत धनगर या कार्यक्रमाचे आयोजन धनगर समाज अध्यक्ष शामराव धनगर यांनी केले होते शामराव धनगरे सतत 28 वर्ष धनगर समाज अध्यक्ष पद भूषवित आहे यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास बोरसे यांनी केले