मेळघाट मध्ये माग्ररोहयो चे कुशल देयके प्रलंबित..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाट मध्ये माग्ररोहयो अंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे दरवर्षी हिताना दिसत आहे. त्याचा सर्वत्र गाजावाजा होतो. सर्व अधिकारी आपापल्या परीने श्रेय लाटण्याचा प्रयत्न करतात. करणारे काम करू करू मरतात आणि श्रेय घेणारे मात्र आपली संधी सोडत नाही. व प्रशासकीय खर्चावर डोळा ठेऊन आपल्या मार्जिने खर्च दाखवतात.मग तो गाडीचे भाडे असो व कार्यालयीन खर्च असो परंतु जो पर्यंत चिरीमिरी होत नाही तोपर्यंत पुरवठादाराचे कुशलचे देयके मिळू देत नाही असे समीकरण झाल्याचे चित्र गेल्या अनेक वर्षांपासून मेळघाट तें जिल्ह्यापर्यंत दिसून येत आहे.सं न 2015 -16 पासून मेळघाट मध्ये शेतस्त्याची व सिमेंट बांधाऱ्याची कामे झाली असून त्याचा अकुशलचा मजुरांची मजुरी मिळाली परंतु कुशल चे पुरवठा दारांचे देयके अद्याप हो प्रलंबित आहेत. त्या करिता आयुक्तमार्फत तपासणी समिती नेमून त्यांनी ही सकारात्मक अहवाल दिला. असे तीनदा होऊनही अद्याप त्यांना देयके प्रदान झालेली नाही त्यामुळे पुरवठादारावर उपासमारीची पाळी आली आहे.त्यांच्या मनामध्ये प्रशासनाच्या विरोधात रोष खदखदत आहे.

Previous Post Next Post