चिखलदऱ्याच्या मोझरी पाॅईटवरील घटना, पोलीसात नोंद नाही.चिखलदऱ्यात वीज पडून अमरावती चे पाच पर्यंटक जखमी...


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी 

मेळघाट पर्यंटनाला आलेल्या अमरावती येथील पर्यटकांच्या पुढ्यात चिखलदऱ्यातील मोझरी पाॅईट येथे रविवारी दुपारी ३ वाजता वीज कोसळली. यात पाच पर्यंटक जखमी झाले. त्यांच्या वर ग्रामिण रुग्णालयात उपचार केल्यानंतर तिंघाना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. या घटनेने पर्यंटन स्थळावर एकच खळबळ उडाली. चिखलदरा येथे प्रत्येक वीकेंडला हजारोंच्या संख्येने पर्यटक भेट देतात. अमरावती येथील साबळे परिवारासह त्यांचे नातेवाईक पर्यंटन सफारीला आले होते. मोझरी पाॅईट परिसरात अचानक वीज कोसळली. तेथे पाॅईट पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना त्याच्या धक्का लागला. त्यामधे किशोर मोतीराम साबळे (५५) वैशाली किशोर साबळे (२६) आदित्य राजेश जवंजाळ (१३) यांच्या वर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. अमरावती येथील सागर ठाकूर (३०)बाह्मणे(५०) हे दोघेदेखील विजेच्या कडकडासह झालेल्या आवाजाने कमालीचे भेदरले होते. त्यांच्यावरही ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. आवाजाने इतर सहकारीही भेदरल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या संदर्भात चिखलदरा पोलीस ठाण्यात कुठल्याही प्रकारची नोंद नव्हती. 

प्रतिक्रिया -:--—

चिखलदरा येथील मोझरी पाॅईटवर वीज कोसळून काही पर्यटक जखमी झाल्याचे समजले होते. त्यासंदर्भात पोलीसात कुठल्याही प्रकारची माहिती आलेली नाही. माहिती घेणे सुरू आहे. 

राहूल वाढवे

ठाणेदार चिखलदरा 

प्रतिक्रिया :------

मोझरी पाॅईट वर वीज कोसळ्यल्याने बाजुला उभ्या असलेल्या तीन पर्यटकांना इजा पोहोचली. त्याच्यावर उपचार करून अमरावती पाठविण्यात आले. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. 

संजय पवार

वैद्यकीय अधीक्षक 

ग्रामीण रुग्णालय, चिखलदरा 

------------------

पर्यंटन स्थळावर मुसळधार पाऊस, धुके..

गत तीन दिवसापासून चिखलदरा पर्यंटन स्थळावर विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाने हजेरी लावून शनिवारी रात्रीसुध्दा धो-धो कोसळला रविवार पावसासह दाट धुके होते.

Previous Post Next Post