जळगाव जामोद शहरातील सास्कृतिक भवन येथे दिनांक 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉ. राजेंद्रजी शिंगणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या हस्ते नवनियुक्त महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस प्रसेनजित पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रसेनजित पाटील यांच्यावर निष्ठा असणाऱ्या अनेक पुरुष व महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.काँग्रेस पक्षात अंतर्गत गटबाजीचे राजकारण सुरू होऊन बाळासाहेब यांना एकाकीपणाची वागणूक दिल्या गेली असा आरोप त्यांचा होता.पक्षात होणारी अंतर्गत घुसमट याचा विचार करून अखेर प्रसेनजीत पाटील यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्यावर विश्वास ठेवून राष्ट्रवादीची घड्याळ हातात बांधली. आणि मागील महिन्यातच नामदार जयंत पाटील ,नामदार राजेंद्र शिंगणे, एकनाथराव खडसे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आणि त्यानंतर कमी अवधीतच त्यांना प्रदेश सरचिटणीस ही जवाबदारी पक्षाने दिली.प्रदेश सरचिटणीस या पदाचा सन्मान मिळाल्यानंतर प्रथम जळगाव मतदार संघात त्यांचा सत्कार, कार्यकर्ता मेळावा घेण्याचे प्रयत्न असताना अखेर दिनांक 5 सप्टेंबर रोजी पालकमंत्री राजेंद्र शिंगणे व जिल्हाध्यक्ष नाझेर काझी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे आयोजन केले होते.त्यांच्या प्रवेशानंतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला त्यांच्या बाजूने येत असल्याचे चित्र मतदार संघात दिसत आहे.दिनांक पाच सप्टेंबर रोजी पिंपळगाव काळे येथे पालकमंत्री राजेंद्र शिंगणे यांच्या उपस्थितीत नवनिर्वाचित प्रदेश सरचिटणीस प्रसंजीत पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्यासोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.यानंतर दुपारी जळगाव जामोद येथील सांस्कृतिक भवनात भव्य पक्ष प्रवेश, सत्कार समारंभ व कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या समारंभाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून पालकमंत्री राजेंद्र शिंगणे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष नाझेर काझी सत्कारमूर्ती प्रसेंजित पाटील हे होते तर व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीमध्ये बुलढाणा जिल्हा पक्ष निरीक्षक रवींद्रजी तौर, प्रवक्ता सेल अध्यक्ष अमोल वानखडे ,विधानसभा अध्यक्ष विश्वनाथ झाडोकार, राष्ट्रवादी नेते प्रकाश शेठ ढोकणे ,रंगराव बापू देशमुख, राष्ट्रवादी नेते संगीतराव भोंगळ ,एड संदीप उगले, विद्यार्थी सेल जिल्हाध्यक्ष भूषण दाभाडे महिला तालुका अध्यक्ष वर्षा ताई वाघ, स्मितलताई पाटील, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष मोविन अहमद, राजू बाप्पू देशमुख, मुख्य प्रशासक कॉटन मार्केट रमेश पाटील, विश्वासराव भालेराव, तालुका अध्यक्ष प्रशांत दाभाडे, धोटे सर ,पराग अवचार, संजय धुर्डे, देविदास पारस्कर ,अजहर देशमुख ,आशिष वायझोडे,सिद्धार्थ हेलोडे ,संजय बापू देशमुख, इरफान खान ,इजाज देशमुख,शेख जावेद,संजय ढगे, बंडू भाऊ वाघ प्रकाश गावंडे ,समाधान निलजे, इत्यादी उपस्थित होते यावेळीशेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक दिनकर दाभाड़े, कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती अशोकभाऊ गवळी व खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष विजय ठाकरे यांनी शेकडो कार्यकर्त्यांन सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश सरचिटणीस प्रसन्नजीत पाटील यांचा भव्य सत्कार.अनेकांनी केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश...
जळगांव जा.प्रतिनिधी:-