राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देशात एक वेगळा लौकिक आहे. विविध इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या सर्वेक्षणांमध्ये ते एक लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले आहेत.कोरोना काळामध्ये जीवाची परवा न करता त्यांनी दिवस-रात्र एक करून काम केले. शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणून शेतकऱ्यांना कर्ज मुक्त करण्याचा प्रयत्न केला, आणि करीत आहेत. स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून मोफत धान्याचा पुरवठा होत आहे ,अशा विविध योजना यशस्वीरीत्या त्यांचे काळात राबवल्या गेल्या असून ह्या विविध योजनांचा सकारात्मक फायदा हा शिवसेनेला होणार आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून राज्यभर रस्त्यांचे विस्तारीकरण होत आहे. महा विकास आघाडीचे शासन शेतकऱ्यांसाठी एक फलदायी शासन ठरले आहे. शासनाच्या विविध योजना शिवसैनिकांनी जनते पर्यंत पोहोचल्या पाहिजेत. विविध ग्रामसेवा संस्था, शेतकी खरेदी विक्री संस्था, जिल्हा सहकारी बँक आदी ठिकाणी आपल्या पक्षाचे जास्तीतजास्त प्रतिनिधी कशाप्रकारे जातील यासाठी जिल्हाप्रमुख तालुकाप्रमुख आणि विभाग प्रमुखांनी लक्ष घालायचे आहे. आगामी काळातील येणाऱ्या नगरपरिषदा, नगरपंचायत आनी जिल्हा परिषद व पंचायत समित्या वर भगवा फडकवण्यासाठी आत्तापासूनच शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे आवाहन बुलढाणा जिल्ह्याचे संपर्क प्रमुख, केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खासदार प्रतापराव जाधव यांनी केले. ते दिनांक १२ सप्टेंबर रोजी आसलगाव येथे तालुक्यातील शिवसेना, विद्यार्थी सेना, युवा सेना, किसान सेना,महिला आघाडी ह्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत अध्यक्षपदावरून बोलत होते. जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील ,जिल्हाप्रमुख शांताराम दाणे ,उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे, तालुकाप्रमुख गजानन वाघ यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.गाव तेथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक ही अभिनव संकल्पना राबवून येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकांसाठी तसेच नगर परिषद निवडणुकांसाठी शिवसैनिकांनी मोर्चे बांधणी करावी असे आवाहन यावेळी जिल्हा सहसंपर्कप्रमुख दत्ता पाटील यांनी केले. खासदार प्रतापराव जाधव यांच्या नेतृत्वात संपूर्ण जिल्ह्यामध्ये नगरपरिषद ,नगरपंचायत आणि जिल्हा परिषद ,प.स.मध्ये शतप्रतिशत भगवा फडकेलच असल्याचे यावेळी जिल्हाप्रमुख शांताराम दाणी यांनी सांगितले. जळगाव जामोद नगर परिषद, तालुक्यातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती सर्कलमध्ये शिवसेना विजय संपादन करून प. स. व न. प. ताब्यात घेईल असा आशावाद यावेळी तालुका प्रमुख गजानन वाघ यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन तालुकाप्रमुख गजानन वाघ यांनी केले.आढावा बैठकीला उपतालुकाप्रमुख पुंडलिक पाटील, देविदास घोपे, सुनील मोरखडे,मुश्ताक भाईजान, विभाग प्रमुख अजाबराव पाटील, विजय काळे, गुनेन्द्र खोदरे, न.प. शिक्षण सभापती रमेश ताडे, खरेदी विक्री संस्थेचे संचालक संजय भुजबळ ,संतोष बोरसे, किसान सेनेचे अशोक टावरी, दिलीप अकोटकार, अरविंद भारसाकडे ,उल्हास माहोदे ,सरपंच नरेश वानखडे ,सरपंच पांडुरंग उगले, युवा सेनेचे शुभम पाटील ,ईश्वर वाघ ,संकेत रहाटे ,विशाल पाटील ,मंगेश कतोरे,युवराज देशमुख,अल्पसंख्यांकांचे जाकीर भाई, चांद भाई ,म।अरुण सोनवणे ,शांताराम धोटे,योगेश पांधी, दिलीप खूपसे ,महिला आघाडीच्या मिना भांगे यांचे सह तालुक्यातील शिवसेना ,युवासेना ,किसानसेना, विद्यार्थीसेना, अल्पसंख्याक,महिलाआघाडीच्या विविध पदाधिकारी यांची यावेळी उपस्थिती होती.
आगामी न.प.आणि जि.प. निवडणूकीत भगवा फडकविण्यासाठी कामाला लागा-- खा. प्रतापराव जाधव यांचे आवाहन...
जळगाव(जामोद)प्रतिनिधी:-