भारतीय सॉफ्टबॉल संघटनेतर्फे कटक ओरिसा येथे दिनांक 19 ते 23 सप्टेंबर या काळात 33 वी राष्ट्रीय सब जुनियर चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी दिनांक 14 सप्टेंबर रोजी नागपूर येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल संघामध्ये येथील तालुका क्रीडा संकुल व स्कूल आँफ स्काँलर ची खेळाडू कुमारी खुशी मिलिंद पाचपांडे हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे .बुलढाणा जिल्हा साँफ्टबाँल संघटनेचे सचिव शेषनारायण लोढे यांच्या मार्गदर्शनात बुलढाणा जिल्ह्याचे सात खेळाडू हे क्रीडा मार्गदर्शक स्वप्नील साळुंके यांच्या नेतृत्वात नागपूर येथे उपस्थित झाले असता संपूर्ण राज्यातून आलेल्या निवडक खेळाडू मधून कु. खुशी पाचपांडे ची राज्य संघात तर कु. भक्ती साळुंके हीची राखीव खेळाडूत निवड करण्यात आली आहे. खेळाडूंच्या निवडीबद्दल आमदार राजेश एकडे,जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव ,तालुका क्रीडा अधिकारी अनिल इंगळे ,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अरूण भोलाने,सचिव शेष नारायण लोढे,स्कूल आँफ स्काँलरचे संचालक अमर संचेती,मार्गदर्शक प्रफुल्ल वानखेडे, छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत साळुंके यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले असून खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक स्वप्नील साळुंके यांना दिले आहे.
खुशी पाचपांडे ची महाराष्ट्र संघात निवड...
मलकापूर प्रतिनिधी:-