निंबा देवी संस्थान नजिकच्या विश्वगंगा नदीच्या डोहातील बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधुन बाहेर काढला.


बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-अनिल भगत.

नांदुरा तालुक्यातील निंबा देवी संस्थान नजिकच्या  विश्वगंगा नदीच्या डोहातील बुडालेल्या युवकाचा मृतदेह शोधुन बाहेर काढला.अकोला जिल्ह्यातील पिंजर येथील मानवसेवा आपत्ती व्यवस्थापनाच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने आज सकाळी 6:30 वाजता अंडर वाॅटर स्विमिंग ने सर्च ऑपरेशन राबवुन 25 फुट खोल पाण्यातील अक्षय वानखडे याचा मृतदेह शोधुन बाहेर काढला.

घटनाक्रम ➡️ ... *नांदुरा तालुक्यातील निंबोळा देवी संस्थान लगतच्या विश्वगंगा नदीपात्रात औरंगपुर गावा लगतच्या डोहात 19 सप्टेंबर रोजी अंदाजे दुपारी पाच वाजताच्या दरम्यान बुलढाणा जिल्ह्यातील शीरसोडी ता.मानोरा येथील अक्षय संदीप वानखडे वय अंदाजे.20 वर्ष हा येथे आपल्या मित्रासह डोहात आंघोळीला उतरले असल्याने यापैकी अक्षय हा डोहात बुडाल्याची अशी माहिती नातेवाइकांच्या सांगण्यावरून नांदुरा तहसीलदार राहुल तायडे सर यांनी तात्काळ मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगेबाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दीली आणी तात्काळ सर्च ऑपरेशन राबविण्यासाठी पाचारण केले. जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांचे सहकारी मयुर सळेदार, उमेश बिल्लेवार,अंकुश सदाफळे,सतीश मुंडाले, ऋषीकेश राखोंडे,राहुल जवके,अंकुश चांभारे, संकेत देशमुख,आणी शोध व बचाव साहीत्यासह काल सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी पोहचले तेव्हा येथे बुलढाणा जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संभाजी पवार यांच्या सह टीम व बुलढाणा पोलीस पथक व रेस्क्युबोट हजर होती.यावेळी दोन्ही टीम मिळुन एक तास सर्च ऑपरेशन राबविण्यात आले परंतु काही मिळुन आले नाही.अंधार होत असल्याने रात्री सर्च ऑपरेशन थांबविले नंतर 21 सप्टेंबर रोजी आज सकाळीच तहसीलदार राहुल तायडे सर यांच्या आदेशाने जिवरक्षक दीपक सदाफळे आणी त्यांच्या सहका-यांनी आज सकाळीच 6:00 वाजता अंडर वाॅटर स्विमिंग सर्च ऑपरेशन चालु केले तेव्हा लगेच 30 मिनटात तळाशी असलेला अक्षयचा मृतदेह वर आणला, अशी माहिती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे. यावेळी नांदुरा तहसीलदार राहुल तायडे सर,आणी महसुल कर्मचारी हे हजर होते. यासह औरंगपुरचे मं.अ.एस.व्ही.बंगाले तलाठी ए.एस.वानखडे, कोतवाल ठाकरे, पो.पा. कोठारे,आणी नांदुरा पोलीस स्टेशन चे एपीआय मानकर साहेब,हे.काॅ. संजय निंबोळकर,पो.काॅ. संजय जवरे,पो.काॅ.शकील तळवी,पो.काॅ.अमोल खोंदील,आणी रेल्वे पोलीस पथक औरंगाबाद हे  हजर होते.

Previous Post Next Post