मेळघाटात सिकलसेल च्या रुग्णांना वेळेवर उपचार झाले पाहिजे म्हणून तालुक्यातील सिकलसेल च्या कर्मचाऱ्यांनी रुग्णांवर लक्ष देणे गरजे आहे.परंतु मेळघाटात असे काही होत नसल्याने सिकलसेल चे पेसेंन्ट दगावण्याची सभांवणा नाकारता येत नाही.
प्राप्त माहितीनुसार :- काही दिवसा अगोदर गौलखेडा बाजार येथील मानवी मनोज पाटनकर ९ वर्षे ही सिकलसेल ची पेसेंन्ट होती. मुलीची तब्येत दिवसा अचानक खराब झाल्याने तिला गौलखेडा बाजार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता या मुलीवर काही औषधी उपचार मिळाले नव्हते. परंतु गौलखेडा बाजार दूसऱ्या उपकेंद्रात मानवी ला तात्पुरते औषधी उपचार झाले होते.मानवी मनोज पाटनकर ९ ही चार वर्षापासुन सिकलसेल ची रुग्ण असून हिला आज पर्यंत चिखलदरा तालुक्यातील सिकलसेल च्या टिम ने येवुन पाहीले नाही. तसेच तालुक्यातील सिकलसेल चे अधिकारी झोपेत आहे. का? माझ्या मुलीला वेळेवर औषधी उपचार झाले असते तर मानवी दगावली नसती. माझी मुलीगी दगावली याला कारणीभूत सिकलसेल चे अधिकारी व आरोग्य विभाग हे आहे. असा आरोप मानवी चे वडील मनोज पाटणकर यांनी केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमानुसार सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमा अंतर्गत मानवी मनोज पाटनकर वय ९ वर्षे हिला आवश्यक सुविधा जसे (कार्ड वाटप, आरोग्य तपासणी, औषधोपचार,) सुविधा देण्यात आल्या. परंतु मानवी मनोज पाटनकर हिला अचानक ताप आल्याने ताप आल्याने तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. असल्याचे
सुमित धनफुले.(चिखलदरा तालुका सिकलसेल सहा.)
