दिनांक 23 सप्टेंबर 2021 रोजी पंचायत समिती चिखलदरा अंतर्गत मा. श्रीमती.माया माने(तहसिलदार) व मा. श्री. जयंत बाबरे (गटविकास अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत नागापूर येथील महसुली गाव वडापाटी येथे पाणलोट नियोजन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्वप्रथम गावकरी तसेच तांत्रिक सहाय्यक व रोजगार सेवक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, महाराष्ट्र अंतर्गत मी समृद्ध तर गाव* समृद्ध, गाव समृद्ध तर मी समृद्ध,पर्यायाने माझा महाराष्ट्र समृद्ध या संकल्पनेतून समृद्धी बजेट तयार करणे या अनुषंगाने समृद्धी बजेट या विषयी तुषार लोखंडे (तांत्रिक सहाय्यक) यांनी मार्गदर्शन केले तद्नंतर लगेच गावफेरी करण्यात आली यामध्ये शाळा अंगणवाडी येथे वॉल कंपाऊंड, पेविंग ब्लॉक, गावातील रस्ते, गुरांचे गोठे, वर्मी कंपोस्ट, इत्यादी गोष्टीचा समावेश करून कुटुंबनिहाय वैयक्तिक लाभाच्या योजनांचा सर्वे करून नोंदी घेण्यात आल्या. नंतर शिवारफेरी साठी एक पाणलोट क्षेत्र निवड करून माथा ते पायथा कसे नियोजन करावे या संदर्भात पाणी फाऊंडेशनचे शिवहरी टेके (तालुका समन्वयक) यांनी उपस्थिताना तांत्रिक मार्गदर्शन केले यामध्ये स्थानिक परिस्थितीच्या पाणलोट क्षेत्रानुसार उपचार निवड कशी करावी याची माहिती दिली. यामध्ये डीप सी.सी.टी., सी.सी.टी., वृक्षलागवड, कंपार्टमेंट बंडिंग, कंटूर बंडीग, लूज बोल्डर स्ट्रक्चर, मातीनाला बांध, शेततळे, विहीर पुर्नभरण, अशा विविध उपचारांची माहिती उपस्थित सर्वांनी जाणून घेतली. यानंतर चर्चासत्र घेण्यात आले. या चर्चासत्रामध्ये तांत्रिक सहाय्यक तसेच रोजगार सेवक व गावकरी यांच्या समस्या अडचणी कामात येणारे अडथळे इत्यादींवर कशा पद्धतीने आपण मात करू शकतो यासाठी पंचायत समितीचे आमलेश मोरले(सहायक कार्यक्रम अधिकारी) यांनी माहिती दिली.यानंतर पुढील नियोजनामध्ये प्रत्येक गावात गावफेरी व शिवारफेरी तसेच कुटुंबनिहाय सर्वेक्षण होऊन प्रत्येक कुटुंबाला लखपती करण्यासाठीचा समृद्ध बजेट तयार करण्यास सुरुवात होणार आहे. या संबंधीचे नियोजन यामध्ये करण्यात आले. या कार्यशाळेचे संचालन व आभार प्रदर्शन वैभव नायसे (तालुका समन्वयक पाणी फाउंडेशन) यांनी केले.तसेच नव्याने नियुक्त झालेले गौरव भुते व वैभव नांदगये (सी.एफ.पी.),श्री मंगेश जयस्वाल(सचिव), जामकर (सरपंच), मेटकर(उपसरपंच), पंचायत समिती तांत्रिक सहाय्यक रोजगार सेवक गावकरी उपस्थित होते.
चिखलदरा तालुक्यामध्ये समृद्धी बजेट तयार करायला सुरुवात.ग्रामपंचायत नागापूर अंतर्गत वडापाटी येथे गाव फेरी व शिवारफेरी संपन्न..
राजु भास्करे /चिखलदरा
