मेळघाट मधील अतिदुर्गम भागातील धारणी येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातील प्राध्यापकांनी मेळघाट मधील गावागावात जाऊन गावातील विध्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी संस्थेच्या अध्यक्षा सौं. विनाताई मालवीय व प्राचार्या सौं. सी. के. देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.वसंतराव नाईक महावीद्यालय हे तालुक्यातील एकमेव वरिष्ठ महावीद्यालय असून गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून सतत विद्यादानाचे कार्य करीत आहे.शिक्षणासोबतच विविध उपक्रम राबवून आदर्श नागरिक घडवण्याचे कार्य या महावीद्यालयामार्फत केले जात आहे.या महावीद्यालयातून शिक्षण घेऊन बरेचजण उच्चपदावर पोहचले.कोरोना काळात लाकडाऊन दरम्यान या महाविद्यालयामार्फत सामाजिक भावनेतून गरजू व गोरगरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले होते.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वदूर लाकडाऊन असल्याने गेल्या दीड वर्षांपासून सर्व शाळा महाविद्यालय बंद असल्याने शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे दुर्लक्ष झाले आहे.विद्यार्थी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर गेले आहे.घरची आर्थिक परिस्तिथी व मनामध्ये असलेली कोविडचीं भीती यामुळे महाविद्यालय सुरु होणार की नाही या संभ्रमात पालक व विध्यार्थी पडले असल्याने त्यांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी वसंतराव नाईक महाविद्यालयाचे प्राध्यापक स्वतः तालुक्यातील गावामध्ये जाऊन पालक व विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करून विध्यार्थ्यानी महाविद्यालयात प्रवेश निश्चित करावा यासाठी वसंतराव महाविद्यालयाचे प्राध्यापक वर्ग यामध्ये प्रा. गणेश वैरागडे, डॉ.रमेश राठोड, प्रा. बिहारीलाल ठाकरे, प्रा.कु. पल्लवी इंगोले प्रा. विकास देशमुख प्रा. रावसाहेब पाटील. प्रा. नाईकवाडे प्रा. वासनिक व प्रा. रोडे यांनी खाऱ्या,मोखा, चिंचघाट,रत्नापूर, गोंडवाडी, दहेंडा, भोकरबर्डी दुनि, बोड या गावात जाऊन सभा, पालक भेटी, पथनाट्य विविध माध्यमातून जनजागृती केली. वसंतराव नाईक महाविदयालयाच्या या उपक्रमाचा विविध स्तरातून कौतुक होत आहे.
वसंतरावनाईक महाविद्यालय येथील प्राध्यापकानी खेडोपाडी केली शिक्षणाची जनजागृती...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
