आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द, मेळघाट मधील विद्यार्थ्यांची विडंबना..


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

आरोग्य विभागातर्गत गेल्या दीड महिन्यापासून क आणि ड प्रवर्गातील पदभरतीची प्रक्रिया सुरु असताना 25 सप्टेंबर ला परीक्षा घेण्याचा राज्यशासनाचा मुहूर्त निघाला व त्याच्या आदल्या दिवशी मेळघाट मधून विध्यार्थी परीक्षेसाठी निघाले,रात्र फुटपाथवर कशीबशी काढली अन सकाळी उठल्यावर त्यांनी मोबाईल वर मॅसेज पहिला तर परीक्षा रद्द.मेळघाट मध्ये अठराविश्व् दारिद्र्य आणि त्यात शासनाच्या वतीने अशी दिशाभूल केली जात आहे. सद्यस्थितीत गावामध्ये कुठल्याही प्रकारची मजुरी नाही. तसेच कामधंदे नसल्याने आर्थिक टंचाई आहे. आणि आपला पाल्य परीक्षा देऊन नोकरीवर लागेल या आशेने आईवडील मुलांसाठी कर्ज काढून त्याला परीक्षेसाठी पाठवत आहेत  घाटातून चार तें पाच तासाचा प्रवास करून मुळे जिल्ह्याच्या ठिकाणी गेले आणि ती परीक्षा रद्द झाल्याने त्याचा फटका आर्थिक व मानसिक संपूर्ण परिवाराला बसत आहे. त्यामुळे शासनाच्या विरोधात जनमानसामध्ये रोष निर्माण होत आहे.

Previous Post Next Post