नांदुरा/प्रतिनिधी.
नांदुरा तालुक्यामध्ये बजरंग दलाचा प्रचंड कार्यवीस्तार चालू असुन असंख्य युवा वर्ग या संघटनेला प्रेरीत होऊन जुडत आहे. आणखी हे पाहता वडी, डिगी, चांदुर बिस्वा व शिरसोडी या गावात भव्य विहिंप बजरंग दल शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आनंदात, उत्साहात व अपार जल्लोषात पार पडला... त्यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक अॅड अमोल भाऊ अंधारे, विश्व हिंदु परिषदेचे विभाग मंत्री उद्धव भाऊ सातव, बजरंग दलाचे विभाग संयोजक पिंटु भाऊ धोरण, विहिंप जिल्हा गौरक्षा प्रमुख गजानन भाऊ डिवरे, विहिंप प्रखंड अध्यक्ष भगवान भाऊ तायडे, विहिंप प्रखंड मंत्री गजानन भाऊ कुऱ्हाडे, बजरंग दल प्रखंड संयोजक सुशील भाऊ कोल्हे, तानाजी वनारे, अतुल बोरसे, पंकज वेरूळकर यांसोबत असंख्य बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते... हिंदु जगे विश्व जगे या प्रचंड जयघोषात गाव तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता निर्माण करून जात पात पंथ पक्ष विरहीत हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व असे धोरण राखुन अखंड हिंदु समाज एकजूट व्हावा असे आव्हाण बजरंग दलाचे नांदुरा प्रखंड संयोजक सुशील भाऊ कोल्हे यांनी केले त्यावेळी स्थायीक गावच्या असंख्य नागरिकांचा व कार्यकर्त्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला..
