नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल सातळी येथे शाळेतील शिक्षकांच्या वतीने विद्यार्थी हेमांशू निंबाजी भालतडक याचा सत्कार कार्यक्रम संपन्न....


 मंगल काकडे:-पिंपळगाव काळे. प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील सातळी येथील गावचा विद्यार्थी यानी नुकत्याच जाहीर झालेल्या नवोदय परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून त्या परीक्षेत त्याने घवघवीत यश मिळून तो उत्तीर्ण झाल्याबद्दल २९ सप्टेंबर २०२१ रोजी बुधवारला उच्च प्राथमिक शाळा सातळी येथील इयत्ता ६ वी मधील हेमांशू निंबाजी भालतड क याने नवोदय परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याच्या शाळेतील शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला.आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व त्याच्या गावामध्ये व सर्वीकडे त्याचे कौतुक होत आहे. हे यश संपादन करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक नितीन सातव सर तसेच सर्व शिक्षकांनी हेमांशु ला मार्गदर्शन केले. सत्कार करताना. वर्गशिक्षक राम चंदनगोळे सर. राजेश काटकर सर. संदिप गाढवे सर. अंगणवाडी सेविका उषा दहिभाते. मदतनीस उषा तायडे. ग्रामसेवक पवन पवार. सरपंच पती जंगलीमन रायपुरे. अक्षय भालतडक. महादेव भालतडक. या सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन हेमांशू याचा सत्कार केला. व पुढील वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा दिल्या.

Previous Post Next Post