अकोट,ता.प्रतिनिधी-सय्यद शकिल.
आँल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन म्हणजेच एमराचा सातवा वर्धापन दिन येत्या ११ सप्टेंबरला देशभर साजरा होणार आहे.ह्या देशव्यापी संघटनेनं कोरोना काळात आपल्या कुटूंबातील मोबाईल व्यवसायिकांचं हितच जोपासलं नाही तर सामाजिक बांधिलकी जोपासून देशहित जोपासण्याची जबाबदारी सुध्दा आपल्या मजबूत खांद्यावर उचलली आहे.एमरातर्फे येत्या ११ सप्टेंबरला शनिवारी कोरोना बाधितांची गरज पूर्ण करण्यासाठी भव्य रक्तदान शिबीर,पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण,तसेच गरजूंसाठीअन्न व वस्त्रदानाचा उपक्रम संपूर्ण देशात एकाच वेळी राबविण्यात येणार आहे,अशी माहिती एमराचे राज्य उपाध्यक्ष संजय विरवाणी यांनी दिली आहे.या दिवशी देशातील मोबाईल व्यवसायिक एमरा अंतर्गत त्यांच्या सजविलेल्या प्रतिष्ठानांमध्ये केक कापून सातवा वर्धापन दिन साजरा करणार आहेत.या सुदिनी सुमारे २५ हजार मोबाईल व्यवसायिकांना राष्ट्रीय मार्गदर्शकांद्वारे डिजीटल अँपवर आभासी मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचेही संजय विरवाणी यांनी सांगितले
🔷रक्तदान शिबीर व इतर उपक्रम🔷
एमराच्या वर्धापनदिनी ११ सप्टेंबरला सकाळी १० ते दुपारी चार वाजेपर्यंत सिंधी वसाहतीतील श्री शक्तीधाम मंदिरात भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. त्यादरम्यान सिंधी वसाहतीत वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते पार पडेल.तसेच गरजूंना अन्न व वस्त्र दान सुध्दा करण्यात येणार आहे.या उपक्रमाचा लाभ गरजूंनी घ्यावा,असे आवाहन राज्य उपाध्यक्ष श्री.विरवाणी यांनी शेवटी केले आहे.