संग्रामपूर तालुक्यातील नेकनामपुर येथिल लोकवर्गणीतून स्लप लेवलपर्यंत बांधकाम केलेल्या सभागृहावर शासनाच्या तिजोरीतून काढलेल्या बिलाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाची उपविभागीय अभियंता यांच्या लेखी आश्वासनाने आज सांगता करण्यात आली. उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम कार्यालया समोर जळगाव येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे संबंधित विभागाचा एकही अधिकारी फिरकला नसल्याने अखेर आज खामगाव येथे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे यांची स्वाभिमानी चे प्रशांत डिक्कर,मोहन पाटील यांनी भेट घेऊन तत्काळ उपोषणाची दखल न घेतल्यास सा.बा.विभाग खामगाव कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला होता. कार्यकारी अभियंता यांनी तत्काळ दखल घेत लोकवर्गणीतून बांधकाम केलेल्या सभागृहावर संबधित अधिकारी व ठेकेदार यांनी केलेल्या घोटाळ्याची चौकशी करून अहवाल कार्यालयास सादर करण्याचे आदेश उपविभागीय अभियंता यांना देण्यात आले. उपविभागीय अभियंता जितेंद्र काळे यांनी उपोषण कर्त्यानसोबत चर्चा करून सभागृहाचे उर्वरित काम ३० दिवसात पूर्ण करुन १५ दिवसात संबंधित प्रकरणाची वस्तुनिष्ठ चौकशी करून अहवाल वरीष्टाकडे सादर करणार असल्याचे लेखी आश्वासनाने उपोषणाची सांगता करण्यात आली. यावेळी स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर, कृ.उ.बा.स.सभापती रमेश पाटील, माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, तुकाराम पाटील, मोहन खंडेराव,शांताराम दाणे,स्वातीताई वाकेकर, राजू भोंगळ, अविनाश उमरकर, गजानन वाघ, रविन्द्र झाडोकार, सतिष चोपडे, ॲड भाऊराव भालेराव, पंजाब वानखडे, विशाल सावंत, उपोषणकर्ते स्वाभिमानीचे उज्वल पाटील चोपडे, यांच्या नेतृत्वात प्रदीप पांडे, अनंतराव चोपडे, वासुदेव निंबाळकर,अरूण चोपडे, संतोष निंबाळकर, विजय आगडते, अरूण अगडते, अतुल कुरवाडे शामराव कुरवाळे, एकनाथ कुरवाडे, संजय पारीसे, वासुदेव कुरवाडे, योगेश अगडते, गोपाल चोपडे, रामेनश्वर कुरवाडे, प्रशांत नागमोते, रामकृष्ण आमझरे, सचिन अगडते, श्रीकृष्ण कुरवाडे, संदीप अगडते,सह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.
नेकनामपुर ग्रामस्थांच्या उपोषणाची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या लेखी आश्वासनाने सागंता...
जळगाव जा.प्रतिनिधी:-
