🔷वार्तापत्र🔷
राजु भास्करे / चिखलदरा
तालुक्यातील राजकीय वातावरण दिवसेंदिवस फार बदलत चाललं आहे निष्ठावान कार्यकर्ते हळूहळू काळाच्या पडद्याड होत चालले आहेत. हाडाचे कार्यकर्ते नामशेष होण्याच्या मार्गांवर आहेत.आज जे नेत्यांच्या मागेपुढे करतात त्यापैकी काही कंत्रातदार असतात तर काही पगारी असतात. काहींचा आपला काहीतरी स्वार्थ असतो, काही तिकीट साठी म्हणून हाजी हाजी करतात.हाडाचे पक्षाच्या ध्येयधोरणावर चालणारे कार्यकर्ते आज अस्तित्वात नाहीतच, जे पक्षच्या ध्येयधोरणावर चालणारे कार्यकर्ते होते त्यांचे डोळे उघडल्याने तें आपापल्या मार्गांवर चालू लागले आहेत.आपल्या मुलांनाही त्या मार्गांवर चालण्यापासून रोखत आहेत आणि तें योग्य ही आहे. योग्य व्यक्ती कोण हे ओळखण्याची गरज आहे. जर टी व्यक्ती योग्य असेल तर निश्चितच समर्थन करा आणि त्यांच्या मागे फिरा पण डोळे व कान उघडे ठेवण्याची गरज आहे.या सर्व परिस्थितीला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो. आजकाल राजकारणात पक्ष कोणताही असो घराणेशाही फोफावत चालली आहे. आमदार खासदारचाच मुलगा वारसा हक्काने आमदार बनत असल्याने एकाच घरात खासदार आमदार जि प अध्यक्ष प. स. सभापती,बनत आहेत, मंत्री असूनही बँकेत सुद्धा प्रतिनिधित्व मिळावं यासाठी प्रयत्नशील आहेत.त्यामुळे इतर लोकांची गोची होत आहे. त्यांनी सतरंज्याच उचलायच्या काय असा प्रश्न नेहमी पडत असल्याने कार्यकर्ते आपल्या मार्गांवर मार्गस्थ होताना दिसत आहेत. हाडाच्या कार्यकर्त्यांना काय हव असते.
जिल्हा परिषद,पंचायत समिती किंवा एखाद्या जिल्ह्यातील, तालुक्यातील समितीवर सदस्यत्व परंतु सत्तापिपासू नेते तेंही सोडायला तयार नाही.सर्व आपल्यालाच हवं.सर्व आपणच उपभोगू या विचारसरनीचे झाले आहेत.तब्बल अकरा वर्षांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत यामध्ये सर्व प्रकारचे आजी माजी नेते, मंत्री रनांगणात उतरले आहेत.कार्यकर्ते अजूनही अजूनही तयार नाहीत का सहकार मदर उतरण्यास तयार नाहीत कि तयार होऊ दिले नाहीत? तयार होऊच द्यायचे नाही.हा संशोधनाचा विषय आहे.जिल्यातील काही नेते नेमके कोणत्या पक्षाचे निष्ठावंत नेते आहेत हे ही समजत नाही.विधानसभेत आपला नेता निवडून यावा यासाठी कार्यकर्ते मरमर करतात.काही पक्षातील समाजातील कार्यकर्ते आपसात भांडण करून वैर घेतात परंतु निवडून आल्यावर तो नेता तुम्हाला किती महत्व देतो? तुमची किती ऐकतो, तुमचे किती काम करतो हे सामान्य कार्यकर्त्याला आता समजले आहे.म्हणून आता निष्ठावंत कार्यकर्ते अश्या नेत्यापासून दुरावत चालली आहेत.