चिखली येथे पुन्हा डेंग्यूसदृश्य आजाराने युवकांचा मृत्यू* गावात दहशत.ग्रामपंचायत चे दुर्लक्ष...



राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणी पासून तीस किमी अंतरावर असलेलं  चिखली गावामध्ये गेल्या दोन महिन्यापासून डेंग्यू सदृश्य आजाराने थैमान घातला असून एकाच महिन्यात दोन युवकांचा बळी या आजाराने घेतल्याने गावामध्ये दहशत निर्माण झाली आहे.चिखली हे गाव चिखलदरा तालुक्यात येत असल्याने सेमाडोह प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत येतो. गावात आरोग्य विभागाचे एक आरोग्य सेवक व एक समुदाय आरोग्य अधिकारी असतात. हरिसाल पासून जवळ  सदर गाव असल्याने या गावातील सर्वच रुग्ण हरिसाल व धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जातात. त्यामुळे गेल्या दोन महिन्यापासून चिखली येथील शंभरपेक्षा जास्त रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाले असून सतत उपचार घेत आहेत.एक महिन्यापूर्वी चिखली येथील मनीष मेटकर या युवकाचा असच डेंग्यू सदृश्य आजाराने मृत्यू झाला होता. चार दिवसापूर्वी आशिष सेलेकर वय 25 या युवकाला खाजगी दवाखान्यात उपचार सुरु असताना त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेंव्हा त्याच्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी झाल्याने त्यादरम्यान आशिषचा मृत्यू झाला. या घटनेने गावामध्ये दहशत पसरली आहे.
*ग्रामसेवक पाहुण्यासारखे गावात येतात*

चिखली येथे ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्याने गावात पाहुण्यासारखा येतात असे उपसरपंच सौं पाटणकर यांनी सांगितले. त्यामुळे गावातील गटार अस्वछ असल्याने आजारात वाढ होत आहे.शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने गढूळ व जंतूयुक्त पाणी पीत असल्याने विविध आजाराची लागण होत आहे .याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
Previous Post Next Post