वरणगावात प्रभाग क्रमांक दोन मधील 100 नागरिकांचे दोन तासात लसीकरण...


 वरणगाव  प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ 

वरणगांव येथील प्रभाग क्रमांक दोन मधील 18 वर्षावारील नागरिकांनी स्वयमस्फूर्तीने दोन तासात 100 जणांनी लसीकरण करून घेतले. आज मंगळवारी दुपारी 12 वाजता बढे वाड्याजवडील मुस्लिम समाज पंच कमेटीच्या हॉलमध्ये आपला माणुस संतोषभाऊ माळी मित्र परिवाराच्यावतीने या लसीकरण कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.या कॅम्पच्या उद्घाटनप्रसंगी मुस्लिम समाज पंच कमिटीचे अध्यक्ष हाजी जमील खान टेलर, उपाध्यक्ष शेख करमोद्दीन, पंच फिरोज शेख, माळी समाजाचे अध्यक्ष संजय माळी, जाफरअली मकसूदअली उर्फ हिप्पीशेठ यांची उपस्थिती होती. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशाने प्राथमिक आरोग्य केंद्र कठोरा यांच्या टीमतर्फे लसीकरण मोहीम त्या मला सहकार्य केले. शहराच्या तथा वॉर्डाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून  आपला माणूस संतोषभाऊ माळी मित्र परिवारतर्फे आजच्या  लसीकरण  कॅम्पचे  आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वार्डातील  जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण करून  घ्यावे, असे आवाहनही  संतोष माळी यांनी केले होते.लसीकरण मोहिम कॅम्पमध्ये वैद्यकीय अधिकारी डॉ.सिमा सोनवणे, आरोग्य सहाय्यक व्ही.आर‌.सारडे, आरोग्य सेवक मनोज अ.माळी, ज्ञानेश्वर प्र.माळी, आरोग्य सेविका श्रीमती सी.जी.भोळे, श्रीमती  एल .एम .लोखंडे, गटप्रवर्तक श्रीमती कल्पना भंगाळे, आशा स्वयंसेविका सरला गावंडे, निर्मला चौधरी, सुनिता भोई,  मनिषा भोई, आॅपरेटर गौरव माळी यांचे सहकार्य लाभले.यशस्वीतेसाठी अय्युब खान, अजमल खान, आवेस खान, अझहर खान, इद्रिस खान, विवेक माळी, हर्षल माळी, तेजस माळी, निखिल माळी, पवन माळी, कुणाल माळी, पवन माळी अतुल माळी, बाळा माळी, सचिन माळी, किरण माळी, सागर माळी, भुषण माळी यांच्यासह आपला माणुस मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

Previous Post Next Post