कोण आवळणार? स्टोन क्रशर गौण खनिज तस्कारांच्या मुसक्या!!विना क्रमांकाचे ट्रक :आरटीओ, पोलिसांनाही चॅलेंज??


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी..

दररोज हजारो ब्रास गौण खनिजांची स्टोन क्रशर संचालक व तस्कर शेत सपाटीकरणाच्या नावावर खुलेआम चोरी करीत आहेत. महसूल विभागाची संशयास्पद भुमिका शासनाला लाखो रुपयांचा चुना लावणारी ठरली आहे. रविवारी प्रत्यक्ष या अवैध खदानीचा फेरफटका मारला असता. विना क्रमांकाचे ट्रक कुठल्याही प्रकारची राॅयल्टी पास वा परवानगी नसताना बिनबोभाट गौण खनिज घेऊन भरधाव जाताना आढळून आले. पोलीस आणि आरटीओ विभागालासुध्दा विना क्रमांकाची ही वाहने आव्हान ठरली आहे. परतवाडा - बैतुल मार्गावरील सालेपुर पांढरी आणि अंजनगाव मार्गावर परसापुर नजिक स्टोन क्रशर संचालक व अंजनगाव सुर्जी, अचलपूर परतवाडा शहरातील गौण खनिज तस्कर दिवस रात्र मेळघाटचे डोंगर पोखरत आहेत. महसूल विभागाची बघ्याची भुमिका पाठराखण करणारी आहे. आदिवासीचे शेत सपाटीकरण करण्याचे नावावर शासनाचे नियम धाब्यावर बसविले जात आहेत. 

🔴विना क्रमांक ट्रक आरटीओ पोलिसांना चॅलेंज🔴

एक तर अवैध पणे डोंगर पोखरून गोण खनिजांची चोरी, दुसरीकडे मागून - पुडून क्रमांक नसलेले ट्रक गौण खनिज नेत असल्याचा प्रकार रविवारी दिसुन आला. महसूल विभागाने डोळे मिटले असले तरी आरटीओ आणि पोलीस विभागाला विना क्रमांकाचे ट्रक दिसू नये. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दोन विभागासाठी हे आव्हान उभे ठाकले आहे. 

🔷चोरीचा माल, ओव्हरलोड भरती🔷

एका ट्रकमध्ये दोन ब्रास गोण खनिज नेण्याचा नियम आहे. मात्र अडवणूक नसल्याने ओव्हर लोड ट्रक तीन ब्रास पर्यंत डब्बर(दगड) आणि मुरुम भरून नेत असल्याचे दिसून आले. त्यावरही कारवाई नसल्याने पोलीस, आरटीओ व महसूल प्रशासन, स्टोन क्रशर संचालकासह गौण खनिज तस्करांच्या ताटाखालचे मांजर झाले का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Previous Post Next Post