हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कार्यवाही करत १७ गोवंशांना जीवनदान देण्यात आले तर तीन आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे.पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळच्या दरम्यान हिवरखेड पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून हिवरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या झरी रस्त्याने कत्तलीसाठी गोवंश आणण्यात येत असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या अनुषंगाने हिवरखेड पोलिसांनी धाड टाकून कार्यवाही केली त्यामध्ये सतरा गोवंशांना जीवनदान देण्यात आले असून तीन आरोपींना अटक करण्यात आली असून तीन बलेरो पिकअप गाड्या सुद्धा जप्त करण्यात आल्या आहेत. MH-३०-AB-२७५२ क्रमांकाच्या पिकअप मध्ये अमानुषपणे कोंबून ठेवलेले सहा जखमी गोवंश, MH-३०-L-३६२५ क्रमांकाच्या बलेरो पिकअप मध्ये पाच जखमी गोवंश, MH-१९-S-३६५८ क्रमांकाच्या बलेरो पिकअप मध्ये सहा जखमी गोवंश असा एकूण सहा लाख अठ्ठावन्न हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तब्बल १७ गोवंशांना जीवनदान दिले आहे या कार्यवाही मध्ये शेख अनवर शेख रउफ, शेख गफूर शेख मेहबूब,शेख मुसा शेख मेहबूब सर्व राहणार हिवरखेड या तीन आरोपींना अटक करण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक ३४५ / २१ भादवी कलम ४२९,३४ तथा सहकलम ५,५(अ),५(ब),९,९(अ) प्राणी संरक्षण अधिनियम ११(अ)(ड)(फ)(इ) प्राणी क्रूरता अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदर कार्यवाही ठाणेदार धीरज चव्हाण यांच्यासह बिट जमादार श्रीकृष्ण सोळंके, अनवर खान,धीरज साबळे,निलेश खंडारे यांनी केली असूनपुढील तपास बिट हेड कॉन्स्टेबल दीपक गवई करीत आहेत.एवढ्या मोठ्या कार्यवाईने नंतर गोवंश कत्तलीचे मोठे रॅकेटच या भागात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले असून हिवरखेड पोलिसांन पुढे मोठे आव्हानच असल्याचे बोलले जात असून पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या गोवंश कत्तलीचा हा गोरख धंदा करणाऱ्यान वर आता हीवरखेड पोलिसांनी आपली करडी नजर ठेऊन आपली पोलिसगिरी दाखवावी अशी मागणी आता नागरिकांकडून होत आहे.
----कत्तलीसाठी जाणाऱ्या 17 गोवंशानां जीवनदान.हिवरखेड पोलिसांची धाडसी कारवाई----
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.