हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड ग्रामपंचायतच्या मालकीच्या संकुलाना या अगोदर थोर महात्माचे नावे देण्यात आलेली आहेत, परंतु डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचे ग्रामपंचायतचे संकुल सध्या नाही आहे, आता नव्याने जिल्हा परिषद गांधी विद्यालयाच्या बाजूला नवीन संकुलचे बांधकाम सुरू आहे,त्या संकुलला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे अशी मागणी हिवरखेड येथील ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने करण्यात आली, छत्रपती शिवाजी महाराज संकुल, महात्मा ज्योतिबा फुले, यांच्या नावाने असलेल्या संकुलच्या सोबतीला डॉ बाबासाहेब आंबेडकर संकुल निर्माण झाले तर आणखी संकुलात भर येईल याकरिता येथील पँथरसेने ग्रामपंचायत सरपंचताई यांना लेखी अर्जु देऊन बांधकाम पूर्ण झाल्यावर संकुलला डॉ बाबासाहेब आंबेडकर नाव देण्यात यावे अशी मागणी केली,