समृध्द गाव स्पर्धेचे एक दिवसीय प्रशिक्षण उत्साहात संपन्न. पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा, मिनी टप्पा स्पर्धा 2 ला सुरुवात...


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी.

पानी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धा  आयोजित एक दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन चिखलदरा तालुक्यातील तीन विभागात घेण्यात आले.समृध्द गाव स्पर्धेत 33 ग्रामपंचायत मधील 46 गावांचा समावेश असून 38 गावातील  79 महिला तर  178 पुरुष असे एकूण 257 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.पाहिले प्रशिक्षण हे मोथा येथे दिनाक 30 सप्टेंबर 2021 रोजी संपन्न झाले.यामध्ये मोथा, मडकी, बोराटयाखेडा, आमझरी, टेटू, बोरी, जामली वन, बेला, कोहाना,या गावांनी सहभाग नोंदवला.नंतर दिनाक 1 व 2 ऑक्टोंबर रोजी, कूलंगना बु.येथे चीचाटी, मलकापूर, वस्तापूर, कूलंगना बू. , चिचखेडा, जामली आर, चांदपुर, धरमडोह, बहादरपुर, काकादरी, पिपादरी, तेलखार, वडापाटी, मांजरकापडी, या गावांनी उस्फुर्त प्रतिसाद घेऊन हे प्रशिक्षण उत्तम रित्या समजून घेतले. दिनाक 11 व 12 ऑक्टोंबर रोजी चूरनी येथील रंगभवण येथे घेण्यात आले.यामध्ये बामादेही, काटकुंभ, कोयलारी, पाचडोंगरी, घाना, आवागड, मेहरीयम, बारूगव्हाण, चूनखडी, माडीझडप, चूरनी, दहेंद्री, कोटमी, तोरणवाडी, या गावांनी उस्फुर्त पने साहभाग घेतला आपल्या गावाला समृध्द करण्यासाठी चे स्वप्न गावकऱ्यांनी पाहीले.आणि ते साकार करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू. असा आत्मविश्वास गावकऱ्यांनी दाखवला तसेच 3 दिवसीय निवासी प्रशिक्षणासाठी होकार देत प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. या प्रशिक्षणात गावकरी यांनी आपल्या गावातील स्वप्नातील गाव कसे असेल याची कल्पना करणे.

पाऊस अपुरा असूनही समृध्दी

आपली माता आपल्याला पाण्याचे नियोजन शिकवते.

पीक नियोजन कसे तयार करावे.

तसेच मिनी स्पर्धा टप्पा- 2 व कृती व नियोजन

हे गावकऱ्यांनी हसत खेळत आनंदाने पानी फाउंडेशन चे प्रशिक्षक उज्वल बोलवार, सीमा ताकसांडे,  हितेश सरप, मीनाक्षी कुबडे यांनी उत्तम रित्या खेळ व मनोरंजनाच्या माध्यमातून शिकवले. आणि गावकऱ्यांनी  आत्मसात केले. या प्रशिक्षणामध्ये समृध्द गाव स्पर्धेतील जलमित्र, रोजगार सेवक, आशा, MSRLM टीम मधील CRP, कृषी सखी, बँक सखी, वर्धीनी, पत्रकार, तर शासकीय अधिकारी कर्मचारी सहभागी झाले.सचिव, तलाठी, तांत्रिक सहायक,कृषी सहायक, वनरक्षक, CFP, तर वन विभाग मध्ये श्री.अभय चंदेल (वनपरिक्षेत्र अधिकारी) तर लोकप्रतिनिधी मध्ये श्रीमती.पुजाताई येवले(जिल्हा परिषद सदस्य) उपस्थित होते.या प्रशिक्षणाचे आयोजन  पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक शिवहरी टेके व वैभव नायसे श्री.प्रफुल कोल्हे (प्रोडक्शन) यांनी केले तर हे प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी मोथा, कुलंगना बू. व चूरनी येथील ग्रामस्थ कर्मचारी यांनी सहकार्य केले.

Previous Post Next Post