जळगाव जामोद,संग्रामपुर, शेगाव तालुक्यातील पिकवीमा रिलायंस जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत वाटप सुरु झालेले आहे. परंतु या वाटपा मध्ये प्रचंड प्रमाणात तफावत असल्याचे निदर्शनात येते. काही महसूल मंडळ मध्ये एकरी १२००० रु. तर काही मंडळामध्ये ८००-९०० रु एकरी विमा मंजूर झाल्याचे निदर्शनास येते.आम्हाला हे अमान्य आहे. ७२ तासात ज्यांनी क्लेम केले त्यांना एकाच गावात महसूल मंडळा नुसार मिळालेली रक्कम आणि सार्वत्रिक नुक़सानामध्ये मंडळ नुसार त्याच गावात मिळणारी रक्कम यात सुद्धा प्रचंड तफावत निदर्शनात येते. पिकवीमा कंपनी एकाच वेळी दुहेरी भूमिका घेत असल्याचे यात प्रकर्षाने निदर्शनात येत असल्या कारणाने आम्हाला आलेला हा पिकवीमा मंजूर नाही. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे. या विषयात तात्काळ लक्ष घालत पिकवीमा कंपनीचे अधिकारी व महसूल विभाग यांची बैठक येत्या १५ दिवसात (२८/१०/२०२१) बोलावून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा तिव्र आंदोलन करण्यात येईल याची दखल घेण्यात यावी.अश्या आशयाचे निवेदन एल्गार संघटने तर्फे उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना देण्यात आले. यावेळी एल्गारचे संस्थापक अध्यक्ष प्रसेनजीत पाटिल, विजय पोहनकर, अजहर देशमुख,संजय देशमुख, आशिष वायझोड़े, ईरफान खान, महादेव भालतड़क, रामेश्वर मानकर, मुजहिर मौलाना,निखील पाथ्रीकर,अरुण बावस्कार सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
जळगाव जामोद, संग्रामपुर, शेगाव तालुक्यातील आलेला पिकवीमा मंजूर नाही - एल्गार संघटना..
जळगांव जा.ता.प्रतिनिधी:-