राज्याचे अन्न पुरवठा नागरीमंत्री छगन भुजबळ यांचा वाढदिवस आणि दसऱ्यानिमित्ताने वरणगावच्या शिवभोजन केंद्रावर श्रीखंड पुरीचे वाटप होणार...


वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ 

वरणगाव येथील शिवभोजन केंद्रावर राज्याचे अन्न पुरवठा नागरी, ग्राहक सुरक्षा मंत्री तथा ओबीसी नेते छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस आणि विजयादशमी दसऱ्यानिमित्ताने बस स्टॅन्ड चौकात असलेल्या शिवभोजन केंद्रावर शुक्रवार दि. 15 रोजी दुपारी 12 ते 2 या वेळेत श्रीखंड पुरी, वरणभात भाजीचे वाटप करण्यात येणार आहे.गरीब व गरजू यांच्यासाठी राज्य शासनाने सुरु करण्यात आलेल्या या शिवभोजन केंद्रावर दररोज भुकेल्या असणाऱ्या गरीब गरजवंताना वरणभात, भाजी, पोळीचे वाटप करण्यात येत असते. परंतु विजयादशमी दसऱ्याचा शुभदिन असल्याने आणि राज्याचे अन्न पुरवठा नागरी ग्राहक सुरक्षामंत्री तथा ओबीसी समाजाचे नेते छगनरावजी भुजबळ यांचा वाढदिवस असल्याने दोन्ही औचित्य साधून येथील बस स्टॅन्ड चौकात असलेल्या शिवभोजन केंद्रावर शुक्रवारी दुपारी 12 ते 2 या वेळेत श्रीखंड, पुरी, वरणभात भाजीचे वाटप करण्यात येणार आहे. शहरातील गरीब व गरजू यांनी या गोडधोड जेवणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिवभोजन केंद्र संचालक संतोष माळी (आपला माणुस) यांनी केले आहे.

Previous Post Next Post