प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत अंबिया बहार मध्ये जळगाव जिल्ह्यातील फळपिकांचा विशेषतः केळी पिकाचा विमा शेतकऱ्यांनी काढलेला होता. सदर योजने अंर्तगत अवकाळी पाऊस व जोरदार वादळामुळे शेतकऱ्यांचे बऱ्याच प्रमाणात नुकसान होऊन पंचनामे करण्यात आलेले होते. परंतु विमा कंपनीकडून पिक विम्याचा मुदत संपलेली असून सुद्धा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात येत नव्हती, यावर वेळोवेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, विमा कंपनी प्रतिनिधी, बँक अधिकारी व जिल्हा कृषी अधिक्षक यांच्या उपस्थितीत अनेक वेळा बैठक घेऊन निर्देश दिले.तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, कृषीमंत्री, कृषी सचिव व जळगांव जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पत्रव्यवहार केला असता, केंद्र सरकार मुळे नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांनी लोकसभेत फळपिक विम्याच्या नुकसान भरपाई बद्दल प्रश्न उपस्थित केला असता, *केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांनी राज्य सरकारचा २०३ कोटी रुपये हिस्सा मिळाला नसल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात विलंब होत असल्याचे सांगितले होते.या अनुषंगाने खासदार रक्षाताई खडसे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुखमंत्री, कृषिमंत्री व कृषि सचिव यांना पत्रव्यवहार राज्य सरकारने तत्काळ राज्याचा हिस्सा देऊन शेतकऱ्यांना विम्याची रक्कम लवकरात लवकर मिळणेसाठी कार्यवाही करावी याबाबत पत्राद्वारे मागणी केली होती.त्यानुसार जळगाव जिल्ह्यातील १२८४७ पात्र विमाधारक शेतकऱ्यांना रु. २८,०३,६२,३४६/-* (अठ्ठावीस कोटी तीन लाख बासष्ट हजार तीनशे शेहेचाळीस रुपये) नुकसान भरपाई रक्कम मंजूर झालेली असून, खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे ऐन दिवाळीत मदत मंजूर झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे.
फळपिक विमा योजना सन 2020-21 अंतर्गत विमा नुकसान भरपाईची रक्कम मंजूर, खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याला यश...
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ