मेळघाट मधील शेतकरी हा अल्पभूधारक शेतकरी आहेत. पोटापुरते त्यामधे पिकावतो, दरवर्षी तेवढेच उत्पन्न काढतो. व त्यावरच आपली उपजीविका चालवतो.मेळघाटमधील शेती ही पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे. वरून राजाची कृपा झाली तर इथल्या शेतकऱ्याचा जयजयकार होतो नाहीतर जीवन ओझं वाटू लागते.यावर्षी सुरवातीला पावसानं वेळेवर येऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई केली व त्यानंतर शेतकऱ्यांच्या हातावर तुरी देऊन पाऊस पसार झाल्याने शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले.त्यामध्ये शेतकऱ्याने पुन्हा कर्ज काढून बियाणे आणले. दुबार पेरणी झाल्यावर काही दिवसातच सोयाबीन वर केसाळ अळीचा प्रारदुर्भाव झाला त्यामध्ये बरिचशी नासाडी झाली. पुन्हा दीड महिना पाऊस पसार झाल्याने पिकांची वाढ खुंटली.नंतर आता उरले सुरले उत्पन्न तोंडाशी आले तर,मेंळघाट मध्ये परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे.ऐन पीक काढणीच्या वेळी अश्या प्रकारे पावसाचं आगमन म्हणजे संपूर्ण पिकाची नासाडी झाली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.सोयाबीन, भुईमूग व ज्वारी पिकाची काढणी सुरु असताना त्यावर धो धो पाऊस आल्याने संपूर्ण पिके उध्वस्त होत आहेत.तोंडाशी आलेला घास हिरावल्या जात आहे.मेळघाट मधील धारणी व चिखलदरा दोन्ही तालुक्यात मागील काही दिवसापासून पाऊस सतत सुरु होता. मध्यन्तरी काही दिवस पावसाने सवड दिल्याने परिस्थिती पूर्वपदावर येताना दिसत होती. परंतु पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने खरीप हंगामातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे सोयाबीन, ज्वारी, मका,कापूस,भुईमूग, यांसारखी पिके काढणे सुरु असताना पाण्याखाली गेली.मेळघाट मधील शेकडो हेक्टर जमिनीवरील पिके आधीच पाण्याखाली गेली. अंन आता परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडापाशी आलेला घास हा अतिवृष्टीमुळे हिरावल्याचे दिसून येते.सोयाबीन सडत आहे, कापूस व बोण्डया सडत आहे आहेत. महसूल व कृषी विभागाने पंचनामे करून झालेल्या नुकसानीची पाहणी करून पंचनामे करावि. व शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी.अशी मागणी सर्वत्र होत आहे.
मेळघाट मधील शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्तीची कुऱ्हाड...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी