महाराजा श्री अग्रसेनजी जयंती हिवरखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.हिवरखेडच्या महाराजा अग्रसेनजी मार्ग येथील श्री मदनलालजी बद्रीलालजी बजाज यांचे निवासस्थानी श्री.अग्रसेन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महिला मंडळींचे आणि लहान मुलांचे अनेक कार्यक्रम घेण्यात आले. तद्नंतर भजन कीर्तन आणि संध्याकाळी महाराजा श्री अग्रसेनजी यांचे पूजन, हारार्पण, नंतर महाआरती आणि तीर्थप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी महिला व लहान मुलांच्या कार्यक्रमातील विजेत्यांना बक्षीस वितरण पार पडले. महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या जीवन कार्यावर यावेळी जेष्ठ मार्गदर्शकांनी प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाला मदनलाल बजाज, डॉ. मुरलीधर अग्रवाल, संतोष बजाज, राजेंद्र माधानी, नंदलाल अग्रवाल, गणेशलाल अग्रवाल, मुन्नासेठ माधानी, महेंद्र बजाज, विनोद बजाज, घिसूसेठ अग्रवाल, राजेश जयनारायनजी अग्रवाल, राजेश मोहनलालजी अग्रवाल, दिनेश बजाज, प्रदीप बजाज, सुनिल बजाज, दिनेश अग्रवाल, अविनाश अग्रवाल, पंकज अग्रवाल(पप्पूसेठ), आतिष बजाज, धिरज बजाज,आशिष अग्रवाल, विवेक अग्रवाल, पावन बजाज, सौरव रामधन अग्रवाल, विपिन माधानी, नयन अग्रवाल, भूषण अग्रवाल, आनंद अग्रवाल, उद्धव बजाज, भव्य माधानी, ओम अग्रवाल, अक्षत बजाज, इत्यादी उपस्थित होते.यावेळी अग्रवाल महिला मंडळ व नवयुवती मंच च्या सर्व प्रतिनिधीनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग घेतला.
हिवरखेड येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी....
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.