उत्तर प्रदेशातील लखीमपुर या ठिकाणी शेतकऱ्यांवर गाडी घालून शेतकऱ्यांना चिरडलेल्या च्या निषेधार्थ दिनांक ११ ऑक्टोंबर २०२१ सोमवार रोजी पुगानात आलेल्या महाराष्ट्र बंदला तालुका जळगाव जामोद येथील पिंपळगाव काळे येथे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला आहे. शेतकऱ्यांवरील हल्ल्याची चौकशी होऊन आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. व या घटनेचा आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने जाहीर निषेध करतो व केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली.यावेळी.प्रकाश पाटील माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष बुलढाणा. प्रशांत राजपूत.सचिन जाधव. शालिकराम भोपळे. अजय ताठे. पराग पाटील राष्ट्रवादी काँग्रेस.संभाजी ठाकूर राष्ट्रवादी काँग्रेस.राजू पाटील. गणेश इंगळे शिवसेना. महादेव घुटे.बंटी कळसकार. फिरोज खान राष्ट्रवादी काँग्रेस. गोपाल तायडे. दामोदर ईनकर. सुरेश चौखंडे.शेख हारुण.किशोर घटे. अभिजीत अवचार.अशोक ढोले. शुभम पाटील. मयूर राऊत.योगेश जाधव. मोठ्या संख्येने पिंपळगाव काळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी व प्रामुख्याने शेतकऱ्यांची पण उपस्थिती होती.
उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथील घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदला पिंपळगाव काळे येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून बंद आणि निषेध...
मंगल काकडे.पिंपळगाव काळे. प्रतिनिधी...