महाविकास आघाडीच्यामहाराष्ट्र बंदला चिखलदरा मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद...


 राजु भास्करे /चिखलदरा प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील लखीमपुर मधिल शेतकऱ्याच्या हत्येच्या निषेध नोंदविण्यासाठी सोमवार दि.  11/10 /2021 ला महाविकास आघाडी ने महाराष्ट्र बंद ची हाक दिली होती. त्याच निमित्ताने चिखलदरा मध्ये दि. 11 रोजी चिखलदरा शहरातील दुकाने कडकडीत बंद करण्यात आले होते. चिखलदरा महाविकास आघाडी च्या वतीने येथील बाजार पेठ व दुकाने बंद करून निषेध करण्यात आले आहे. या मध्ये मेळघाट क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल, अमरावती जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती दयाराम काळे, चिखलदरा पंचायत समिती सभापती बंन्सी जामकर,मेळघाट युवक काँग्रेसचे अध्यक्ष यशवंत काळे, माजी सभापती रजनी बेलसरे, सहदेव बेलकर, श्रीकृष्ण सगणे सर, हमीद अहमदखान, असे  सर्वच महाविकास आघाडीचे पदाधिकारी बहू संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post