संग्रामपूर येथे आढावा बैठकीत आपदग्रस्तांना मदत देण्याचे आमदार कुटे यांचे निर्देश...




 संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर संजय कुटे यांनी संग्रामपुर तहसील येथे ढगफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांकरिता आढावा बैठक घेतली यामध्ये संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारे, पळशी झाशी, सावळी, टाकळी पंच, आवार, उकळी आदी गावांमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. या पावसाने  नागरिकांची घरे, शेती पीके व मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांच्या हातातोंडाशी आलेला घास  हिरावून गेला आहे,प्रशासकीय अधिकाऱ्यांशी बोलून प्रशासनाने तात्काळ पंचनामे सुरू करण्याच्या नुकसान भरपाई मिळवून देण्याबाबत आवश्यक ती पावले तातडीने उचलण्याच्या सुचना केल्या आहेत.उपविभागीय अधिकारी,गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा करून अधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जावे, नुकसानीची पाहणी करावी. त्याचे अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवावे, असे निर्देश दिले.ढगफुटीसदृश्य पावसामुळे तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नागरिकांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.असे आमदार डॉ. संजय कुटे म्हणाले यावेळी आढावा बैठकीला उपविभागीय अधिकारी तेजश्री कोरे,नायब तहसिलदार प्रविण वराडे,मंडळ अधिकारी, तलाठी यासह भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष लोकेश राठी,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जानराव देशमुख, पंचायत समिती उपसभापती अंबादास चव्हाण, डॉक्टर गणेश दातीर, सुधाकर शेजोळे, रणजीत डाबेराव सह बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post