राष्ट्रवादी युवक काँग्रेस जळगाव जामोद तालुक्याच्या वतीने पेट्रोल,डिझेल,गॅस व जीवनावश्यक वस्तुंच्या वाढत्या किमतीच्या विरोधात उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांना निवेदन देऊन निषेध करण्यात आला. पेट्रोल,डिझेल चे भाव शंभरी पार गेल्यामुळे सर्वसामान्य जनतेचे अतोनात हाल होत आहेत. सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आला आहे त्यामुळे पेट्रोल,डिझेल,गॅस व जीवनावश्यक वस्तुंचे भाव मोदी सरकारने तात्काळ कमी करावेत याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निवेदन देऊन मोदी सरकारचा निषेध करण्यात आला. तसेच स्थानिक पेट्रोल पंप येथे मोदी यांच्या प्रतिसमोर येणाऱ्या काळात सर्वसामान्य जनतेला झाकनाने पेट्रोल भरायची पाळी येईल हे सुतोवाच करण्याकरिता मोटर साईकल मध्ये चमच्याने पेट्रोल भरून देण्याचे अनोखे आंदोलन सुद्धा करण्यात आले. सदर आंदोलन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष पराग अवचार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले यावेळी एम.डी.साबीर,विश्वास भालेराव,संतोष जवरे,आशिष वायझोड़े, अनिल असंबे, संभाजी ठाकुर, फिरोज खान,जितेंद्र चहल, सागर मुंढे, दत्ता डिवरे,आकाश जाने,स्वप्निल आटोळे, योगेश घोपे,,गणेश जाने,शुभम अवचार,संदिप झाटे, सतिष तायडे, मनोज झाटे, गजानन झाटे, भानुदास वायझोड़े, विजय झाटे, गोपाल वासनकर, राम वायझोड़े,शुभम रोठे यांच्यासह असंख्य युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले चमच्याने पेट्रोल चे वाटप.पेट्रोल,डिझेल दरवाढीचा निषेध नोंदवत केले अनोखे आंदोलन...
जळगांव जा.प्रतिनिधी:-