तलाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असल्याने, शेतकऱ्यांना शेतीचा ७/१२ उतारा मिळणेसाठी अडचणी येत असून, शेतकऱ्यांना उतारा मिळणेसाठी पर्यायी व्यवस्था करणे बाबत कार्यवाही करणेसाठी खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांनी जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करून सूचना केल्या.मागील काही दिवसांपासून तलाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून केळी पिक विमा उतरविण्यासाठी जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची धावपळ सुरू असुन तलाठ्यांच्या संपामुळे शेतकऱ्यांना शेताचा ७/१२ उतारा मिळण्यास अडचणी येत आहेत. केळी पिक विमा उतरविण्याची मुदत संपण्यात असुन, शेताच्या उताऱ्या अभावी शेतकरी केळी पिक विमा लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधीच अवकाळी पाऊस व जोरदार वादळाचे संकट असुन, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी निवेदनात म्हटले.तरी सदर बाबींचा विचार करून शेतकऱ्यांना केळी पिक विमा उतरविण्यासाठी शेताचा ७/१२ उतारा मिळणे बाबत, पर्यायी व्यवस्था होणेसाठी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावरून तात्काळ कार्यवाही करावी याबाबत खासदार रक्षाताई खडसे यांनी सूचना केल्या
केळी पिक विमा उतरविणाऱ्या शेतकऱ्यांना शेत उतारा मिळणेसाठी पर्यायी व्यवस्था करा, खासदार रक्षाताई खडसेंची जिल्हाधिकारी यांना सूचना..
वरणगाव प्रतिनिधी - सुनिल पाचपोळ