३ कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमीपूजन सोहळा संपन्न...जळगाव करांना अपेक्षीत विकास साधण्याचा प्रयत्न केला - सौ सीमा डोबे..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

नगरपरिषद जळगाव जामोद च्या वतीने आयोजित विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा आज दिनांक ३ आक्टोंबर रोजी माजी मंत्री आमदार डॉ संजय कुटे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ सीमा डोबे ह्या होत्या. जळगाव जामोद शहरातील माळीखेल येथे रस्ता बांधकाम, भीमनगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळ कंपाऊंड वॉल व रस्ता बांधकाम, पंचशील नगर येथे डॉ बाबासाहेब पुतळ्या जवळ वरच्या मजल्याचे बांधकाम, वायलीवेस येथे पद्मामवती नदीवर पूल बांधकाम करणे, बोडखे लेआऊट मध्ये उद्यान विकसीत करणे यासह रस्ते, नाली व स्मशानभूमी आदी 3 कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.या भूमिपूजन सोहळ्याला सभापती मांगीलाल भन्साली, सभापती सविता कपले, सभापती उषाताई धंदर, सभापती आशीष सारसर, नगरसेविका सौ जयमाला इंगळे, सौ सविता खवणे, सौ रत्नप्रभा खिरोडकार, नगरसेवक शैलेंद्र बोराडे, निलेश शर्मा, युवा जिल्हाध्यक्ष सचीन देशमुख, डॉ प्रकाश बगाडे, शहर अध्यक्ष अभिमन्यू भगत, महिला शहर अध्यक्ष शिल्पा भगत, प्रा राजेश गोटेचा, करणसिंग राजपूत, जमील टेलर, अशपाक, गोटू खत्ती, बाळू चव्हाण, परीक्षित ठाकरे, उमेश येऊल, रमेश कोथळकार, अरुण खिरोडकार, सुरेश इंगळे, शरद खवणे, अजय वंडाळे,शाकिर खान, कैलास पाटील, पांडुरंग मिसाळ, रामा इंगळे, सोनू ढोकणे, ओंकार वानखडे, शोएब, सचीन कल्याणकर, निलेश धुर्डे यांचेसह अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी या सोहळ्याला उपस्थीत होते.
Previous Post Next Post