आजही आदिवासी बहुल भागातील समस्या कायम आहेत.. जळगावजामोद तालुक्यातील सातळी या गावाला जाण्यासाठी नदी पार करून जावे लागत आहे.. मात्र पावसाळ्यात नदीला पूर असतोच तेव्हा मात्र गावाचा संपर्क तुटतो.. अश्या परिस्थितीत रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी नदी पार करावी लागते......मोठी कसरत करीत रुग्णाला हॉस्पिटल ला न्यावे लागत आहे कित्येक वर्षांपासून नदीवर पूल बांधून देण्यात यावा ही मागणी सातत्याने जिल्हा प्रशासनाकडे ग्रामस्थाने केलेली आहे मात्र अद्याप पर्यंत ही मागणी मंजूर झाली नसल्याने आज एका रुग्णाची तब्बेत बिघडल्याने त्या रुग्णाला हॉस्पिटल मद्धे नेण्यासाठी नदीच्या प्रवाहातून उचलून न्यावे लागले हे वास्तव आहे आदिवासी बहुल भागातील .. आता सातळी गावाला जाण्यासाठी नदीवरील पूल बांधल्या जाईल का असा प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. आज दिनांक १७/०१/२०२१ अतिवृष्टी मुळे गावाचा संपर्क तुटला असता गावातील गजानन बेपारी इसम बीमार असतांना त्यांना गावातील महादेव भालतड़क, अशोक गवळी सह गावकर्यांनी नदी पात्रातुन उचलून नेऊन हॉस्पिटल मध्ये नेले. त्यामुळे सातळी सह परिसरात संतप्त भावना व्यक्त होत आहेत.
सातळी गावाची समस्या कधी सुटेल.... पावसाळ्यात गावाचा तालुक्याशी तुटतो संपर्क.पुलाची मागणी पूर्ण होईल का ..ग्रामस्थाचा जिल्हा प्रशासन लोक प्रतिनिधीला प्रश्न...
जळगांव जा.प्रतिनिधी:-