हिवरखेड येथे नवरात्री मध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा एकदिवसीय ईनामाय उत्सव साजरा करण्यात आला, हा उत्सव विजय दशमीच्या पाहिले एक रात्र साजरा केला जातो,संध्याकाळी मातीच्या ईनामाय मूर्ती तयार करून स्थापणा केली जाते,या मध्ये ईनामाय समोर मातीची बंडी व हत्ती ,घोडे ठेवले जाते ,व सेवक म्हणून मातीचे ,शेकूर, नावाचे आजोबा तिथे राखणदार ठेवले जातात, हत्तीच्या सोडीत निबू ठेवले जातात, आणि गावातील भाविक महिला ईनामायच्या दर्शनाला भाकरीचा निवैध घेऊन येतात,सोबत प्रसाद म्हणून निबू ,अंगारा घेऊन जातात, ईनामाय भक्तांच्या मनोकामना पूर्णकर्ते अशी भक्तांची श्रध्दा आहे, अनेक वर्षांपासून ही परंपरा नवरात्री मध्ये साजरी केली जाते, ईनामाय उत्सव संध्याकाळी सुरू होते, व दुसऱ्या दिवशी पहाटे इनामायचे विसर्जन कोणालाच न दिसता करावे लागते अशे या उत्सवाचे नियम व श्रद्धा भक्त पार पाडतात या उत्सवाचे काम दत्तू धुरदेव हे अनेक वर्षांपासून पाहत आहेत,
हिवरखेड येथे एकदिवशीय ईनामाय उत्सव साजरा, नवरात्री उत्सवात येथो हा ईनामाय उत्सव,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.