तिवडी येथील गावठाण व बुडित जमिनीच्या भूसंपादन प्रश्नां वरून जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बंडू पाटील यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांचे अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन..


मंगल काकडे/ पिंपळगाव काळे प्रतिनिधी.

जळगाव जामोद तालुक्यातील तिवडी गावठाण व बुडीत जमिनीच्या भूसंपादन प्रश्ना वरून दिनांक.०१/१०/२०२१ शुक्रवार रोजी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते बंडू पाटील यांच्या नेतृत्वात गावकऱ्यांचे अप्पर जिल्हा अधिकारी यांना निवेदन सादर केले असून जिगाव धरणाचे  पाणी साठवल्या नंतर पात्रा पासून १०० मीटर अंतरावरील तिवडी व सुलतानपूर या गावातील जमिनी पाण्याखाली जातील ही वस्तुस्थिती जिल्हा परिषद विरोधी पक्ष नेते बंडू पाटील यांनी विस्तृत चर्चेतुन अप्पर जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनात आणून दिली. तसेच संबंधित भूसंपादन प्रक्रियेत कुठलीही प्रगती न झाल्यास गावकऱ्यांसह लोकशाही मार्गाने उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे ही निवेदनात नमूद केले आहे.यावेळी भाजप सरचिटणीस रवि पाचपोर , तसेच तिवडी येथील दिनकर पाचपोर,विलास झाल्टे, पंडितराव घाईट, अजय घाईट, प्रशांत झाल्टे,सुनील गई, पंकज घाईट, लहू झाल्टे, आशिष गई, परमेश्वर घाईट, रामेश्वर खवले, गोपाल घाईट, तेजराव घाईट, गजानन गई सह अनेक शेतकरी व तिवडी येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous Post Next Post