जळगांव जा.प्रतिनिधी:-अनिल भगत.
जळगांव जा तालुक्यातील आदिवासी,डोंगराळ भागातील जि.प.म.प्राथमिक शाळा चारबन ही विविध उपक्रम राबवणारी शाळा असून कोरोना काळातही शिक्षकांनी 100% विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविल्याने आजही विद्यार्थ्यांची गुणवत्ता कायम आहे.कोरोना महामारीच्या काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थांना कसे शिकवावे असा प्रश्न असतांना चारबन शाळेतील शिक्षक दीपक उमाळे यांच्यासह मुख्याध्यापक दांडगे सर,मोसंबे सर,गावित मॅडम यांनी गावकऱ्यांच्या मदतीने शाळा आपल्या दारी,शिक्षक मित्र,फळा तेथे शाळा,विद्यार्थी बनले शिक्षक यासह विविध उपक्रम राबवून सातपुड्यातील दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोचविले.गावातील मोठ्या मुलांना व शाळा व्यवस्थापन समितीला प्रेरणा देऊन त्यांनी गावातील शाळेच्या मुलांना गावातच मंदिरात,चावडीवर शिक्षण दिले,डोंगरावर शिक्षण दिले.शाळेची शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असून चारबन शाळेची आय.एस.ओ.कडे वाटचाल सुरू आहे.शाळेतील गावात निरक्षर आदिवासी बांधव वास्तव्य करीत असून त्यांच्या कडे ऑनलाईन शिक्षणासाठी सर्वांकडे मोबाईल उपलब्ध नव्हते म्हणून शिक्षकांनी ऑनलाईन सोबत ऑफलाईन शिक्षण देऊन विद्यार्थ्यांची गुणवत्ता कोरोना काळातही कायम ठेवला आहे.