मडाखेड येथे दुचाकीचा अपघात होऊन दोन इसम जखमी...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यातील मडाखेड येथे दिनांक 16 ऑक्टोंबर रोजी संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास मोटारसायकल स्लीप होऊन रोडच्या कडेला असलेल्या आठ फूट नालीमध्ये जाऊन पडल्यामुळे दोन इसम जखमी झाले होते. रात्री आठ वाजेच्या सुमारास काही नागरिकांनी त्यांचा खोल खड्ड्यामधून आवाज येत असल्याचे  ऐकल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यांना रोडच्या कडेला मोटर सायकल पडलेली दिसली असता नागरिकांनी खड्ड्यांमधून नागरिकांना बाहेर काढले व मराखेड येथील सामान्य रुग्णालयात नेले असता तेथे त्यांना डॉक्टर दिसले नाही. मडाखेड येथील रुग्णालयामध्ये रात्री आठ नंतर डॉक्टर उपलब्ध नसल्याने अशा काही घटना झाल्यास त्यांना जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचाराकरिता न्यावे लागते. त्यामुळे या दोन्ही इसमांना तेथीलच सामाजिक कार्यकर्ते विनोद कडाळे, अक्षय बाराहाते, अरूण घेंगे,रमेश पोहरे यांनी जळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचाराकरिता आले असता तेथे त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना खामगाव येथे रेफर करण्यात आले. सदर घटनेमध्ये जखमी झालेल्या व्यक्तींमध्ये सुरेश पोहरे व अंबादास चव्हाण हे दोन व्यक्ती आपल्या मोटर सायकलने घरी जात असताना मोटरसायकल स्लिप झाल्याने हा अपघात घडला. ग्रामीण रुग्णालय जळगाव जामोद येथे सदर इसमांना राजू बुटे व प्रेम डागा यांनी स्ट्रेचर वर दवाखान्यात दाखल केले. सामाजिक कार्यकर्ते विनोद कडाळे यांना मडाखेड येथील रुग्णालया बाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की आमच्या येथील दवाखाना संध्याकाळनंतर बंद असतो. त्या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध असूनही दवाखान्यात उपलब्ध नसतात.

Previous Post Next Post