धारणीतील मंगेश याउल तापी नदीत पाय घसरून बुडाले...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

धारणीतील  भाजपचे नेते सुधाकर पकडे यांचा भासा मंगेश सुभाष याउल (35) यांचा दुर्गादेवी विसर्जन दरम्यान तापी नदीत पाय घसरून बुडाल्याने त्यांचा अद्याप ही पता लागला नाही.रेशक्यु टीमला पाचारण केले असून कालपासून सतत प्रयत्न करून अद्यापही मंगेश मिळाला नसल्याने धारणीत एकच खळबळ उडाली आहे.मंगेश याउल ह्यांचा कटलारी व साउंड चा व्यवसाय होता. त्यामुळे त्यांचा खेड्यातील लोकांशी संपर्क होता. नवरात्री संपताच दसऱ्याच्या दिवशी नवदुर्गा विसर्जन करण्याकरिता तापी नदीवर गेले असता त्या दरम्यान त्यांचं पाय घसरून तें नागउतार रस्ता सोनाबार्डी घाटवर तापी नदीत पडले व खोलवर जाऊन बुडाले असल्याची माहिती मिळाली आहेत. त्यानंतर तें वर आलेच नाही त्यामुळे परिवारातील लोकांनी शोध घेतला परंतु न मिळाल्याने धारणी पोलिसांना सदर माहिती दिली असतापोलिसांनी शोधण्याचा प्रयत्न केला. पता न लागल्याने पोलिसांनी त्वरित रेशक्यु टीम बोलावून शोध मोहीम हाती घेतली कालपासून शोध सुरु असून अद्यापही मंगेश चा पता लागला नाही.

Previous Post Next Post