राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
धारणी पासून जवळ असलेल्या व मध्य प्रदेशाच्या सीमेलागत असलेली तालुक्यातील सक्रिय ग्रामपंचायत म्हणून परिचित असलेल्या भोकरबर्डी ग्राम पंचायत येथे गांधी जयंती साजरी करण्यात आली. 2 ऑक्टोबर रोजी भोकरबर्डी येथे गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती साजरी करण्यात आली.याप्रसंगी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच श्रीमती क्रांती दहिकर यांचे उपसरपंच रोहित पाल यांचे हस्ते हारार्पण करूनअभिवादन केले.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य राजकिशोर साखरे, नितेश चतुर, हरी जांभेकर, रमेश पटोरकर, रवी चंदेल, बुडा जांभेकर गगन पाल, अविनाश धांडे, संगीता शेलूकार, ग्रामसेवक विवेक राठोड,व सर्व ग्रामवासियांनी महात्मा गांधीजींना व शास्त्रीजीना अभीवादन केले.
