हिवरखेड सदाशिव संस्थान येथे महात्मा गांधीजी यांच्या अस्थीक्लेश स्थापन असल्याने या संस्थांनाला गांधी स्मारक सुद्धा म्हणतात, २ ऑक्टोबर रोजी या विधानावर गावातील आम नागरिकांनी गांधी जयंती साजरी केली, महात्मा गांधी व लालबाहदूर शास्त्री याच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले असून हार फुले वाहून त्याच्या जीवणार प्रकाश टाकण्यात आला, गांधी जयंतीचे औचित्य साधून उपस्थित नागरिकांनि मुख प्रदर्शन केले, हातात नगरपंचायत होण्याचे फलक धरून तीन नागरिकांनी तोंडावर हात, डोळ्यावर हात, आणि कानावर हात ठेवले व संदेश दिला , बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो,असे प्रदर्शन करून शासनाला कळविले प्रशानाला माहीत असून की गावात हिवरखेड वासीयांची नगरपंचायत होण्याची मागणी आहे,तरीही प्रशाश्नान मात्र डोळ्यांनी पाहून गप्प आहे,नागरिकांचे काहीच आयकत नाही,व नागरिकांचे काहीच पाहत नाही, असे हे मूक प्रदर्शन झोपलेल्या प्रशाश्नानाला जाग करण्यासाठी गांधी जयंती निमित्ताचे औचित्य साधून करण्यात आले, महात्मा गांधी यांच्या विचारांवर हिवरखेड वासी चालत आहे , म्हणूनच शांतिच्या मार्गाने हिवरखेड मध्ये नगरपंचायत व्हावी याकरीता शांतीचे आंदोलने करत आहेत ,पण लवकरच नगरपंचायत न झाली तर शांत आंदोलने करणाऱ्या नागरिकांच्या शांतीच्या मार्गाचा भंग होणार आणि तिर्व आंदोलने केली जातील, नागरिक रुद्र अवतार घेऊन तिर्व आंदोलने छेडतील , प्रशाश्नाने तात्काळ नगरपंचायत करावी अशी मागणी गांधी जयंती दिनाच्या दिवशी आम नागरिकांनी केली आहे ,यावेळी उपस्थित गणेश सुरजोसे, भारत बोबडे, युनिसभाई, जिया पठाण, सागर उरकडे, अर्जुन खिरोडकार हे उपस्थित होते,
हिवरखेड सदाशिव संस्थान गांधी स्मारकं येथे गांधी जयंती साजरी,जयंती दिनी हिवरखेड नगरपंचायत करिता मुख प्रदर्शन,
हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
