राजु भास्करे /अमरावती
धारणी वरून अकोट मार्गे असलेल्या ढाकणा फाट्यावर अतिवृष्टी मुळे पुलात माती भरल्याने पाणी वाहने बंद झाले आहे. त्यामुळे ढकणा फाट्यावर इंदोर महामार्गांवर पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे त्यामुळे वाहतुकीला खोळंबा होत आहे.धारनी ढाकणा रस्ता सार्वजनिक बांधकाम उपविभाग धारणी च्या देखरेखीखाली असून दोन दिवसापासून सुरु असलेल्या सततधार असलेल्या पावसाने फाट्यावरील पुलं मुरुम व मातीनी बंद झाल्याने रोडवर एक ते दिड फुट पाणी साचुन रहदारीस बाधा निर्मान झाला असुन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे.समंधीत सार्वजनिक बांधकाम विभागाणे लक्ष देवुन पुलातील कचरा माती व मलबार काढून रहदारीस नागरिकांना होनारा त्रास दूर करण्याची मागणी केली जात आहे.
