जळगाव जा.तालुका प्रतिनिधी:-
जळगांव तालुक्यातील ग्राम गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावरील नाल्याच्या पुलाखाली अज्ञात महिलेचा मृतदेह सापडल्याने उडाली एकच खळबळ जळगाव जामोद पोलिसांनी बारा तासाच्या आत मृतक महिलेची ओळख पटवुन आरोपीचा शोध लावण्यामध्ये मिळविले यश. गाडेगाव खुर्द येथील पोलीस पाटील राहुल नामदेव निंबाळकर यांनी दिनांक ७ ऑक्टोबर रोजी जळगांव पोलीस ठाण्यात फोन करून सदर घटनेची माहिती दिली.की गाडेगाव खुर्द ते खांडवीरोड वरील भास्करराव शिंगणे शाळेजवळील नाल्याच्या पुलाच्या खाली कोण्यातरी अज्ञात महिलेचा मृतदेह एका पोत्यामध्ये भरलेला दिसत असून त्या पोत्यातील महिलेचे पाय बाहेर आहेत अश्या प्रकारची तक्रार दिली.पोलीस पाटलांच्या तक्रारीवरून जळगांव जामोद पोलिसांनी घटनास्थळ गाठुन पंचनामा करीत महिलेचे प्रेत शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.पोलिसांनी अज्ञात आरोपी विरोधात अपराध नं.८१६/२०२१ कलम ३०२,२०१ भा द वी नुसार गुन्हा दाखल केला.ठाणेदार सुनील अंबुलकर व पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे,सचिन राजपुत, अनिल सुशिर हे घटनास्थळावर महिलेची ओळख पटवण्यासाठी तपासाची चक्रे फिरविली यामधुन ठाणेदार सुनील अंबुलकर यांना माहिती मिळाली की संजय पारस्कर राहणार टाकळी पारसकर यांच्या शेतामध्ये मागील दोन-चार दिवसापासून जनावरे उपाशीपोटी बांधलेली आहेत आणि त्या ठिकाणी कोणीच नाही या माहितीच्या आधारे ठाणेदार सुनील अंबुलकर व टिम चौकशी करीता शेतामध्ये गेली असता.शेतमालक यांना बोलावून चौकशी केली असता संजय पारस्कर यांनी सांगितले की चार-पाच दिवस अगोदर त्यांनी शेतामध्ये काम करण्यासाठी नंदू उर्फ कैलास जवंजाळ राहणार हिवरा तालुका मुक्ताईनगर या व्यक्तीला एका महिलेसोबत कामावर ठेवले होते.अशी माहिती दिली त्यावरून नंदू जवंजाळ याच्या सामानाची झडती घेतली असता मृतक महिलेची माहिती मिळाली. सदर मृतक महिलेचे नाव पिंकी उर्फ सुरेखा नितवणे राहणार हिवरा तालुका मुक्ताईनगर असे होते.तसेच महिलेचे माहेर जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव असून मृतक महिलेचे लग्न पंधरा वर्षा आधी हिवरा येथे झाले होते परंतु सात-आठ वर्षाआधी मृतक महिलेच्या पतीचे निधन झाल्याने सदर महिला संशयित आरोपी नंदू उर्फ कैलास जवंजाळ याच्या संपर्कात होती मागील पाच सहा महिन्यापासून मृतक सुरेखा व कैलास जवंजाळ हे दोघे आसलगाव येथे राहत होते व नंतर पाच-सहा दिवस आगोदर टाकळी पारसकर येथे संजय पारस्कर यांच्या शेतात मुक्कामी कामासाठी गेले होते व नंतर सुरेखा मृतावस्थेत गाडेगाव खुर्द ते खांडवी रस्त्यावर एका पुलाखाली पोत्यात भरलेली सापडली व तिच्या सोबत राहणारी व्यक्ती म्हणजेच कैलास फरार असून जळगाव पोलिसांनी त्याचा शोध घेतला असुन लवकरच त्याला ताब्यात घेतले जाईल.घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी अभिनव त्यागी यांच्या आदेशानुसार ठाणेदार सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे पोलीस नाईक अनिल सुशिर ,पोलीस शिपाई सचिन राजपूत व इतर सहकारी करीत आहेत. सदर महिलेच्या नातेवाईकांनी महिलेचा अत्यविधी करण्याकरिता नकार दिल्याने. जळगाव जामोद पोलिसांनी दाखविले"माणुसकी चे दर्शन सदर महिलेवर करण्यात आले हिंदू स्मशानभूमी येथे अंतिम संस्कार"गाडेगाव ते खांडवी रस्त्यावर सापडलेल्या महिलेचा अंतीमविधी करण्यासाठी नातेवाईकांनी नकार दिल्याने जळगांव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर,पोलीस उपनिरीक्षक सचिन वाकडे, हेड कॉन्स्टेबल विनोद वानखडे,अमोल वनारे, सचिन राजपूत,निलेश पुंडे,सुनील वावगे व सहकारी तसेच पत्रकार व पंचासमक्ष जळगांव जामोद येथील हिंदू स्मशानभुमी येथे सदर मृत महिलेवर अंतीमसंस्कार करून जळगांव जामोद पोलिसांनी पुन्हा एकदा मानिसकीचे दर्शन घडवले हे विशेष...