जळगाव जामोद शहर काँग्रेस कमिटी व काँग्रेसचे सर्व नगरसेवक यांनी दिनांक ०७ आक्टोंबर २०२१ रोजी मुख्याधिकारी व मा. अध्यक्ष यांना दिलेल्या सा खळी उपोषणाच्या इशाऱ्याची दखल घेऊन २४ तासाचे आत त्यांनी जळगाव जामोद शहरातील पंतप्रधान आवास योजना (घरकुल) लाभार्थ्यांना आज दिनांक ०८ ऑक्टोंबर रोजी दुपारी नगरपरिषदेने काँग्रेस नगरसेवकांचा धसका घेत चौथा टप्पा वळती केला असून एकूण ९३ घरकुल लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम प्रत्येकी ५० हजार रुपये याप्रमाणे आजरोजी ४६ लक्ष ५० हजार रुपये अनुदान वितरित केले असुन. अनुदानापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांचे अनुदान पुढील तीन-चार दिवसात वितरित करण्याचा शब्द नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी लेखी स्वरूपात काँग्रेसच्या नगरसेवकांना दिला आहे. तशा स्वरूपाचे लेखी पत्रच काँग्रेस नगरसेवकांना दिल्यामुळे काँग्रेसचे नगरसेवक व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तूर्तास साखळी उपोषण तात्पुरते स्थगित कले असून उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान न टाकल्यास आंदोलन करण्यात येईल असा असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला. यावेळी काँग्रेसचे गटनेते नगरसेवक अर्जुन घोलप, एडवोकेट संदीप मानकर, श्रीकृष्ण केदार, बाळू इंगळे, यांच्यासह बहुसंख्य काँग्रेसचे पदाधिकारी व बहुसंख्य घरकुल लाभार्थी यावेळी उपस्थित होते.
काँग्रेस नगरसेवकांच्या आक्रमकतेमुळे अनुदानापासुन वंचित घरकुल लाभार्थ्यांना मिळाले अनुदान...
जळगांव जा.प्रतिनिधी:-